आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 वर्षांपूर्वी झाले 'शोले'च्या 'ठाकूर'चे निधन, हे 8 कलाकारसुद्धा आता या जगात नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः हिंदी सिनेसृष्टीचे अष्टपैलू कलाकार संजीव कुमार यांना या जगाचा निरोप घेऊन 32 वर्षांचा काळ लोटला आहे. 6 नोव्हेंबर 1985 रोजी हार्ट अटॅकमुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती. संजीव कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये 'आंधी', 'खिलौना', 'पति, पत्नी और वो' आणि 'अंगूर' या सिनेमांसह अनेक हिट कलाकृती दिल्या आहेत. मात्र शोलेमध्ये त्यांनी वठवलेली ठाकुर बलदेव सिंहची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. 15 ऑगस्ट 1975 रोजी रिलीज झालेला हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीतील मैलाचा दगड आहे.  सिनेमा आजही प्रेक्षकांच्या फेवरेट लिस्टमध्ये सामील आहे. 'ठाकुर'सह अशा आणखी काही व्यक्तिरेखा आहेत, ज्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले, मात्र या भूमिका साकारणारे कलाकार आज आपल्यात नाहीत.  एक नजर टाकुया या स्टार्सवर...    
बातम्या आणखी आहेत...