आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी-जॉनच्या हेअर स्टायलिस्टचा खुलासा - 24व्या वर्षी झाली गँगरेपची शिकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन आणि धोनीसोबत सपना - Divya Marathi
जॉन आणि धोनीसोबत सपना
मुंबई - टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस -6' मध्ये सहभागी झालेली सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भावनानी हिच्यावर शिकागोमध्ये गँगरेप झाल्याचा खुलासा तिने स्वतः केला आहे. सपना 24 वर्षांची असताना ख्रिसमसच्या रात्री तिच्यावर बलात्कार झाला होता. याचा खुलासा तिने फेसबुक पेज ह्युमन्स ऑफ बॉम्बे यावर पोस्ट करुन केला आहे. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, युवराज, गौतम गंभीर, रोहित शर्मा यासारख्या क्रिकेटर्ससह कॅटरिना, बिपाशा, ऐश्वर्या, जॉन अब्राहम, हृतिक रोशन, गौरी खान, डिनो मोरिया आणि मंदिरा बेदी सारख्या सेलिब्रिटीजची ती हेअर स्टायलिस्ट राहिलेली आहे.

सपनाने पोस्ट मध्ये लिहिले आहे, 'वडिलांच्या मृत्यूनंतर मी शिकागोला गेले होते. तिथे माझ्यासारखे इतरही लोक होते. तिथे मी मुक्त जीवनाचा अनुभव घेतला. टॅटू आणि केसांसोबत अनेक प्रयोग करुन पाहिले. ख्रिसमसच्या रात्री मी शिकागो मधील एका बारमधून एकटी निघाले होते. तेव्हा मी शॉर्ट ड्रेसवर होते आणि रेड लिपस्टिक लावलेली होती. मी 24 वर्षांची होते आणि दारू प्यालेली होती. तेव्हा काही मुले माझ्या जवळ आले आणि माझ्यावर बंदूर रोखली. त्यांनी मला ओरल सेक्स करायला सांगितले, त्यानंतर गँगरेप केला. त्यानंतर मी घरी परतल्याचे मला आठवते. या कडू आठवणी विसरण्यासाठी वर्षे गेली. मात्र, त्यानंतरही मी छोटे कपडे आणि रेड लिपस्टिक लावते.'
बांद्र्यात लोक वेश्या म्हणत होते
फेसबुक पोस्टवर सपनाने तिच्या राहाणीमानामुळे लोकांचा तिच्याकडे बघण्याच्या दृष्टीकोणाबद्दल लिहिले आहे. सिगरेट ओढणे आणि वेगवेगळ्या पद्धतींचे, नव्या डिझाइनचे कपडे वापरल्यामुळे मी 14 वर्षांची असतानाच लोक मला होर (वेश्या) म्हणत असल्याचा उल्लेख केला आहे. सपना लिहिते, 'मी 14 वर्षांची असताना सिगरेट ओढत असे, मोटरसायकल चालवत होते. तेव्हा बांद्र्यातील लोक होर म्हणायाचे पण त्याचा अर्थ तेव्हा मला कळत नव्हता. पण असे केल्याने जर मी वेश्या झाले असते तर मला आनंदच झाला असता.'

पतिच्या अत्याचाराचीही शिकार
सपनाने पुढे पतीसोबतच्या संबंधावर लिहिले आहे.'माझ्या शाळकरी मित्रासोबत पुढे माझे लग्न झाले. त्यानंतर मला कौटूंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला. तेव्हा मी विचार करत होते,की माझ्यासारख्या स्त्रीवादी महिलेवर असे अत्याचार कसे काय होऊ शकतात ? पण काही गोष्टी तुमच्या हातात नसतात. आपण अशा जगात राहातो जिथे प्रत्येकजण अन्यायाविरोधात आवाज उठवतो आणि संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो. पण माझी मनोमन इच्छा आहे, की कोणालाही मारहाण होऊ नये. कोणालाही इच्छा नसते की तिच्यावर बलात्कार व्हावा. कोणीच आपल्या शरीराची विक्री करु इच्छित नाही. मला माझ्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी 20 वर्षे लागली. मला वाटते,की महिलांनी आतल्या आत कुढत बसणे म्हणजे त्या कुमकुवत आहेत असे होत नाही. ती आमची ताकद आहे आणि लोकांनी त्याचा सन्मान केला पाहिजे.'

पुढील स्लाइडमध्ये, संबंधित फोटोज...