आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Sara Ali Khan In Stress After Jhanvi Kapoor Look In Dhadak, Mom Amrita Meets Director

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जान्हवीच्या डेब्यू फिल्मने सारा अली खानला टेंशन, आई अमृता पोहोचली डायरेक्टरकडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या भविष्याची चिंता फक्त सर्व सामान्यांनाच असते असे नाही. सेलेब्सलाही त्यांची मुलं-मुली लवकर रुपेरी पडद्यावर झळकावी आणि यशाने त्यांच्या पायात लोळण घ्यावे असेच वाटत असते. बॉलिवूडमध्ये सध्या श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर यांचीच चर्चा सुरु आहे. जान्हवी 'धडक'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या फिल्मचे पहिले पोस्टर नुकतेच रिलीज झाले होते. त्याची सोशल मीडियासोबतच बॉलिवूड वर्तुळातही चर्चा आहे. यामुळे जान्हवी-इशानचे पॅरेंट्स आनंदी आहेत, तर दुसरीकडे अमृतासिंह तिची मुलगी सारा अली खानबद्दल चिंतीत आहे. 

 

झाले असे, की जान्हवी आणि इशानच्या फिल्मची चर्चा बॉलिवूडमध्ये जोरदार सुरु आहे. यामुळे सैफ अली खानची पहिली पत्नी अमृतासिंह आणि मुलगी सारा यांना टेंशन आले आहे. साराही लवकरच डेब्यु करणार आहे. डायरेक्टर अभिषेक कपूरची फिल्म 'केदारनाथ'मधून सारा डेब्यू करत आहे. या फिल्ममध्ये तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत आहे. 

 

सारा-जान्हवीच्या फ्रेंड सर्कलमध्येही 'धडक'
- मराठी ब्लॉकबस्टर 'सैराट'चा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक'बद्दल सारा आणि जान्हवी यांच्या फ्रेंडसर्कलमध्येही उत्सूकता आहे. यामुळे साराला टेंशन आले आहे. 
- जान्हवीची फिल्म जर आपल्या डेब्यू फिल्मपेक्षा चांगली झाली तर? अशी चिंता माय-लेकींना सतावत आहे. 
- अमृतासिंहने नुकतीच अभिषेक कपूरची भेट घेतली आहे. या भेटीत काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही. मात्र आपल्या मुलीची फिल्म जान्हवीच्या डेब्यू फिल्मपेक्षा चांगली व्हावी हेच सांगण्यासाठी अमृता गेली होती, असे कळते. 
- विशेष म्हणजे, याआधी करण जोहर साराला लाँच करणार होता, मात्र कुठे माशी शिंकली माहित नाही, आणि आता तोच करण जान्हवीला लाँच करणार म्हटल्यावर अमृताला चिंता तर सतावणारच, काही झाले तरी ती आई आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...