आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sara Sachin Tendulkar Shahid Kapoor To Romance In Bollywood Film

सचिन तेंडुलकरची मुलगी साराची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, शाहिदसोबत झळकणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची स्टायलिश लेक सारा तेंडुलकर लवकरच एका नव्या इनिंगमध्ये दिसण्याची शक्यता आहे. बातमी आहे, की सारा लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारेय. 18 वर्षीय सारा अनेक इव्हेंट्समध्ये आपल्या वडिलांसोबत हजेरी लावताना दिसत असते. सारा ग्लॅमरस आणि ग्रेसफुल आहे, याबाबत कुणाचेही दुमत नाही.
एका प्रसिद्ध वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सारा तेंडुलकर लवकरच बॉलिवूडमध्ये दिसण्याची शक्यता आहे. असे म्हटले जाते की साराचा पहिला सिनेमा अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबत असणार आहे. या बातमीवर विश्वास ठेवला असता, ग्लॅमरस साराचे दर्शन लवकरच रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना घडेल.
काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत सचिनला साराच्या बॉलिवूड एंट्रीबाबत प्रश्न विचारला गेला होता. मात्र सचिनने त्यावेळी स्पष्ट बोलण्यास नकार दिला होता. त्यामुळे सारा तेंडुलकर सिनेक्षेत्रात एंट्री करण्याची शक्यता वाढली आहे.
टीव्ही अभिनेत्यासोबत करतेय डेटिंग ?
टीव्ही अभिनेता हिमांश कोहलीसोबत सारा डेटिंग करत असल्याचेही मध्यंतरी ऐकिवात होते. यात कितपत तथ्य आहे, हे तर सारालाच ठाऊक.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सचिन तेंडुलकरच्या लाडक्या लेकीची खास छायाचित्रे...