आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर यामुळे डेब्यु चित्रपटात बिकीनी घालणार नाही सैफची मुलगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री अमृता सिंह आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान लवकरच करण जोहरचा चित्रपट स्टुडंट ऑफ द इअर 2 चित्रपटातून बॉलिवूड डेब्यु करणार आहे. या चित्रपटात तिचे काही बिकीनी सीन असणार, अशी जोरदार चर्चा होती पण आता याबाबतीत अमृता सिंहने सारा बिकीनी घालणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
 
अमृताची इच्छा आहे की, साराने पटौदी परिवाराच्या पावलावर पाऊल न ठेवता केवळ अभिनयाच्या जोरावर नाव कमवावे. पटौदी घराण्याच्या सर्व स्त्रिया म्हणजेच शर्मिला टागोर, करिना कपूर खान आणि सोहा अली खान यांनी चित्रपटात बिकीनी घातलेल्या आहेत. यामुळे अमृता सिंहने असे विधान केले आहे. 
 
माहितीनुसार, करण जोहरच्या प्रोडक्शनखाली बनण्यात येणारा स्टुडंट ऑफ द इअर 2 चित्रपटात साराचे 3 बिकीनी सीन होते.

- अमृताला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा तिने यासाठी सरळ नकार दिला. अमृताचे म्हणणे आहे की, घटस्फोटानंतर सारा आता पटौदी कुटुंबाचा हिस्सा नाही.
- करण जोहरही हे बिकीनी सीन काढण्यासाठी तयार झाला आहे, कारण त्याला चित्रपटाची स्टारकास्ट अनाउंस करण्यास उशीर झाला आहे.
मासिकासाठी साराने केले आहे फोटोशूट 
- साराने आतापर्यंत कोणत्याच चित्रपटात काम केले नसले तरी ग्लॅमर वर्ल्डमध्ये प्रवेश केला आहे. तिने एका मासिकासाठी खास फोटोशूट केले आहे.
- जानेवारी 2012 मध्ये साराने हॅलो या मासिकासाठी हे फोटोशुट केले होते. ज्यात अमृता सिंहही होती
- साराने 2012 साली रॅम्पवर डेब्यु केला होता. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी ती पार्टी आयोजित केली होती.
- ही पार्टी अबू जानी-संदीप खोसला यांनी फॅशन वर्ल्डमध्ये 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल ठेवण्यात आली होती.
- सारा अबू-संदीप यांनी डिजाईन केलेला ड्रेस घालून रॅम्पवर उतरली होती. 
 
पाहा पटौदी कुटुंबाच्या अभिनेत्री पुढील स्लाईडवर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...