आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saugandh To Gabbar Is Back Akshay Kumar Different Looks

'सौगंध'पासून ते 'गब्बर इज बॅक'पर्यंत : 24 वर्षांत असा बदलत गेला अक्षयचा LOOK

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता अक्षय कुमार स्टारर 'गब्बर इज बॅक' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात अक्षने गब्बर सिंह राजपूत नावाच्या तरुणाची भूमिका साकरली असून भ्रष्टाचाराविरोधात तो लढा देतो. सिनेमातील अक्षयचा लूक वेगळा असून त्याने आपल्या या भूमिकेसाठी दाढी वाढवली आहे. तसे पाहता अक्षय आपल्या सिनेमातील भूमिकेसोबतच लूकमुळेही चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या लूकमध्ये तो मोठ्या पडद्यावर अवतरला आहे.
'सौंगध'पासून ते 'गब्बर इज बॅक'पर्यंत.. अनेकदा बदलला अक्षयचा लूक
अक्षयने 1991 मध्ये 'सौगंध' या सिनेमाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले. त्यावेळी सडपातळ असलेल्या अक्षयचे केस बरेच मोठे होते. त्याकाळात लांब केसांची फॅशन होती. मात्र जसजसे अक्षयचे करिअर पुढे सरकले, तसतसा त्याच्या लूकमध्ये बदल घडत गेला. 24 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सिनेमांत अक्षय कधी लहान तर कधी लांब केसांत दिसला. इतकेच नाही तर कधी पोनी, कधी जीरो मशीन, कधी पगडी, तर कधी मिशीत अक्षय दिसला.
अक्षयच्या सिनेमांतील असेच काही निवडक लूक आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत. पुढील स्लाईड्मध्ये पाहा अक्षयचे विविध लूक...