आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिस-या दिवशी घसरले \'सुल्तान\'चे कलेक्शन, मात्र मोडित काढला आजवरच्या ईद रिलीजचा रेकॉर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या 'सुल्तान' या सिनेमाचे कलेक्शन तिस-या दिवशी घसरले. मात्र तरीसुद्धा ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सर्व सिनेमांचे रेकॉर्ड सुल्तानने तोडले आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, सुरुवातीच्या तीन दिवसांत या सिनेमाने घरगुती बॉक्स ऑफिसवर 105.3 कोटींची कमाई केली आहे.

किती घसरले 'सुल्तान'चे कलेक्शन
- बुधवारी रिलीज झालेल्या सलमान खान आणि अनुष्का शर्मा स्टारर या सिनेमाने पहिल्या दिवशी भारतात 36.5 कोटींचा व्यवसाय केला.
- दुस-या दिवशी म्हणजे गुरुवारी सिनेमाने 37.2 कोटींचा व्यवसाय केला.
- तिस-या दिवशी म्हणजे शुक्रवारी सिनेमाच्या कलेक्शनचा आकडा 31.5 कोटी इतका होता, म्हणजेच पहिल्या दिवसापेक्षा 5 कोटींनी कमी.

सलमानने स्वतःचाच रेकॉर्ड केला ब्रेक
- सुल्तानच्या माध्यमातून सलमानने गेल्यावर्षी ईदला रिलीज झालेल्या बजरंगी भाईजान या सिनेमा रेकॉर्ड मोडित काढला आहे.
- आत्तापर्यंत 103 कोटींचा व्यवसाय करत बजरंगी भाईजान हा सिनेमा ईदला रिलीज झालेल्या हायेस्ट फस्ट वीकेण्ड ओपनर सिनेमा होता.
- 2009 पासून सलमानचे सिनेमे ईदला रिलीज होत आहेत. 2013 मध्ये मात्र शाहरुखचा चेन्नई एक्स्प्रेस हा सिनेमा रिलीज झाला होता.
- शाहरुखच्या चेन्नई एक्स्प्रेसने 2013 मध्ये ईदचा मुहूर्त गाठत पहिल्या विकेण्डला 100 कोटींचा व्यवसाय केला होता.

ओवरसीजमध्ये सिनेमाची चांगली सुरुवात...
'सुल्तान'ची ओवरसीजमध्ये चांगली सुरुवात राहिली. रिलीजच्या पहिल्या दिवशी सिनेमाने 20.5 कोटी रुपये कमावले. दुस-या दिवशी कलेक्शन सामान्य राहिले.

वर्षाचा सर्वात मोठा, सलमानच्या करिअरमधाल दुसरा आणि ओव्हऑल तिसरा बिगेस्ट ओपनर ठरला आहे 'सुल्तान'... बघा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...