आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या चित्रपटात असे दिसत होते विनोद खन्ना, काही दिवसांपूर्वीच खंगला होता चेहरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चित्रपट अभिनेता आणि माजी केंद्रीय मंत्री असलेले विनोद खन्ना यांचे गुरुवारी दीर्घ आजारानंतर निधन झाले. 70 वर्षीय विनोद यांनी जवळपास 144 चित्रपटात काम केले होते. ग्वालियर सिंधिया घराण्याच्या राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्यावर बनवण्यात आलेला बायोपिक 'एक रानी ऐसी भी थी' मध्ये त्यांनी शेवटची भूमिका केली. हा चित्रपट अनेक राज्यात टॅक्स फ्रि करण्यात आला होता.
 
- विनोद खन्ना यांचा हा चित्रपट 21 एप्रिलला रिलीज झाला होता. चित्रपट उत्तर प्रदेश, मध्ये प्रदेश आणि राजस्थानमध्ये टॅक्स फ्रि करण्यात आला होता. 

- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानने विनोद खन्ना यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले "आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारे विनोद 
खन्ना याचे अचानक निघून जाणे फारच त्रासदायक आहे असे ते म्हणाले." 
 
अशी होती विनोद खन्ना यांच्या शेवटच्या चित्रपटाची कथा..
 
- 'एक रानी ऐसी भी' या चित्रपटात हेमा मालिनी यांची मुख्य भूमिका होती. मागील काही दिवसां पूर्वी जेव्हा या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी राजमाता यांची मुलगी यशोधरा राजे सिंधिया यांनी विनोद यांच्याशी निगडीत अनेक आठवणी शेअर केल्या. 
- विजयाराजे सिंधिया एक आई म्हणून मुलाच्या प्रेमासाठी फार तरसल्या. पण त्यावेळी अशीच स्थिती होती की आई आणि मुलगा आपापल्या जिद्दीवर अडले होते. 
- यशोधरा यांनी सांगितले की, राजमाता 19 महिन्यांपर्यत तिहाड जेलमध्ये राहिल्या होत्या.
- हा चित्रपट गोवासच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे पुस्तक 'राजपथ से लोकपथ' वरुन बनविण्यात आला आहे. 
- हा चित्रपट बनविण्यासाठी अनेक प्रकारचे रिसर्च करण्यात आले. चित्रपट बनवण्यासाठी 7 वर्ष लागले आहेत. 
- या चित्रपटाची शूटिंग सवाई माधोपूर, हैदराबाद, उत्तीसगढ आणि बस्तरमध्ये झाली आहे. 
- या चित्रपटाच्या संबंधित दिग्दर्शक गुलबहार सिंग यांनी सांगितले की, हा चित्रपट एक बायोपिक आहे आणि त्यामुळेच बनवायला जास्त कठिण होता.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, चित्रपटाच्या प्रमोशनवेळीचे फोटोज्...
 
बातम्या आणखी आहेत...