आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seema Biswas Literaly Cried Because Of Nude Scene In Bandit Queen

सिनेमातील 'त्या' न्यूड सीननंतर रात्रभर रडली होती ही अॅक्ट्रेस, जाणून घ्या का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळः चंबळची डाकू फुलन देवीच्या आयुष्यावर आधारित 'बँडिट क्वीन' या सिनेमात फुलन देवीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सीमा बिश्वास यांनी अलीकडेच भोपाळला भेट दिली. ज्या सिनेमामुळे मी देशभरात प्रसिद्ध झाले, त्या सिनेमातील एका न्यूड सीनमुळे मी रात्रभर रडली होती, असे सीमा यांनी सांगितले. वाचा, आपल्या पहिल्या सिनेमाविषयी काय म्हणाल्या सीमा बिश्वास...

न्यूड सीनच्या शूटिंगनंतर संपूर्ण युनीट रडले होते...
सीमा बिश्वास यांनी dainikbhaskar.com सोबत बातचित करताना सांगितले, "त्यावेळी सिनेमाविषयीच्या लोकांच्या प्रतिक्रिया फारशा चांगल्या नव्हत्या. विशेषतः सिनेमातील न्यूड सीनविषयी. अनेक जण या भूमिकेमुळे माझा तिरस्कार करु लागले होते. मी मात्र याविषयी कधीही स्पष्टीकरण दिले नाही."
सीमा बिश्वास यांनी सांगितले, की ते बोल्ड सीन्स त्यांनी नव्हे तर त्यांच्या बॉडी डबलकडून करुन घेण्यात आले होते. याविषयी त्यांच्या आईवडिलांना कल्पना होती, त्यामुळे त्यांनी कधीही कुणाला याविषयी स्पष्टीकरण दिले नाही. सिनेमातील तो सीन चित्रीत झाल्यानंतर माझ्यासोबत सिनेमाची संपूर्ण टीम रडली होती, असे सीमा यांनी सांगितले. हा सीन शूट होताना सेटवरुन सगळ्यांना बाहेर काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यूड सीनसाठी नव्हत्या तयार
सीमा बिश्वास यांनी सांगितले, की त्यांनी शेखर कपूर यांना सिनेमातील तो न्यूड सीन हटवण्याची विनंती केली होती. मात्र शेखर कपूर म्हणाले होते, की हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे, त्यामुळे सिनेमात लोकांची असंवेदनशीलता दाखवण्यासाठी तो सीन महत्त्वाचा आहे.
हॉलिवूड करतो सलाम, तर भारतीय बघताच वेगळ्याच दृष्टिकोनातून....
सीमा बिश्वास म्हणाल्या, ''तो न्यूड सीन मी न करतासुद्धा आजही हॉलिवूडचे अॅक्टर्स त्यासाठी मला सलाम करतात, मात्र भारतीय त्या सिनेमाला दुस-याच दृष्टिकोनातून बघतात.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बँडिट क्वीन सिनेमा आणि फुलन देवीची निवडक छायाचित्रे....