आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरींच्या पहिल्या पत्नीला अंत्यदर्शनापासून ठेवण्यात आले दूर, अश्रू झाले अनावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-   बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले. 6 जानेवारीच्या सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी सायंकाळी अनेक तारे- तारकांच्या उपस्थितीत ओम पुरी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. ओम पुरींच्या अंत्यदर्शनाला त्यांची पहिली पत्नी सीमा कपूरही आल्या होत्या. मात्र त्यांना ओम पुरींचे अंत्यदर्शन घेण्यास अडवण्यात आले. याचा खुलासा सीमा कपूर यांचे भाऊ आणि बॉलिवूड अभिनेते अनू कपूर यांनी एका मुलाखतीत केला आहे. 
 
अंत्य विधीपासून ठेवण्यात आले सीमा कपूर यांना लांब...
अनू कपूर यांनी मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ओम पुरींच्या निधनाने सीमा कपूर पूर्णपणे कोलमडून गेल्या आहेत. ओम पुरींच्या अंत्ययात्रेत सीमा यांच्यासोबत एक अतिशय वाईट घटना घडली. त्यांना ओम पुरींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊ देण्यात आले नाही. ही अतिशय खेदजनक बाब असल्याचे अनू म्हणाले. सीमा यांच्या या अपमानाने अनू कपूर खूप चिडले आहेत. आता आपल्या बहिणीची काळजी घ्यायची असून  घडला तो भूतकाळ होता, असे ते म्हणाले. 
 
वर्षभरात मोडले होते ओम पुरी आणि सीमा कपूर यांचे लग्न... 
ओम पुरी यांचे पहिले लग्न अनू कपूर यांची बहीण सीमा कपूर यांच्यासोबत झाले होते. लग्नापूर्वी ओम पुरी, सीमा कपूर यांना 11 वर्षांपासून ओळखत होते.  सीमा यांनीच ओम यांना लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी ओम पुरी दुस-या तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे त्यांनी सीमा यांना लग्नासाठी नकार दिला होता. मात्र नंतर 1990 मध्ये दोघांनी लग्न केले. हे नाते वर्षभरसुद्धा टिकू शकले नाही. लग्नाच्या काही महिन्यांतच ओम पुरींच्या आयुष्यात पत्रकार असलेल्या नंदिताची एन्ट्री झाली होती. कोलकातामध्ये एका मुलाखती दरम्यान नंदिता आणि ओम पुरींची भेट झाली होती. विवाहित असूनसुद्धा ओम पुरी यांचे नंदितासोबत अफेअर सुरु झाले होते. त्यामुळे सीमा कपूर घर सोडून निघून गेल्या होत्या. त्याकाळात सीमा यांचा गर्भपातही झाला होता. काही महिन्यांनी त्यांनी ओम पुरींना घटस्फोट दिला होता.  
 
वादग्रस्त राहिले दुसरे लग्न... 
1993 मध्ये ओम पुरींनी जर्नलिस्ट नंदिता पुरीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगासुद्धा आहे. मात्र  2013 मध्ये हे दोघे विभक्त झाले. नंदिता यांनी ओम पुरी यांच्या मारहाणीचा आरोप लावला होता. ओम यांची बायोग्राफी 'Unlikely Hero: Om Puri' नंदिता यांनी लिहिली होती. असे म्हटले जाते, की 2009 मध्ये ही बायोग्राफी प्रकाशित झाल्यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. ओम यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गौप्यस्फोट  नंदिता यांनी या बायोग्राफीत केले होते. त्यामुळे दोघांचे नाते संपुष्टात आले होते. नंदितासोबत दुसरा संसार थाटल्यानंतरही ओम पुरी पहिल्या पत्नीला भेट असल्याचे नंदिता यांनी म्हटले होते. या कारणामुळे नंदिता आणि ओम पुरी यांच्या नात्यात वितुष्ठ निर्माण झाले होते.  

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, शोकाकूल सीमा कपूर आणि ओम पुरींच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या कलाकारांची छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...