आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sexually Abused Story Of Actresses Like Somi Ali, Kalki, Tabbu And Many More

केवळ सोमी अलीच नव्हे, या बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा पडल्या आहेत लैंगिक अत्याचाराला बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सोमी अली (मध्यभागी), तब्बू, मेडोना, लेडी गागा आणि कल्कि कोचलिन)

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची पूर्वाश्रमीची प्रेयसी सोमी अलीचे ती पाच वर्षांची असताना लैंगिक शोषण झाले होते. याची माहिती स्वतः सोमी अलीने एका मुलाखतीदरम्यान दिली आहे. मुळची पाकिस्तानातील असलेल्या सोमी अलीने स्वतःवर घडलेल्या या प्रसंगाविषयी सांगितले.
सोमीने सांगितले, 'घरात एक नोकर होता, त्याने माझे लैंगिक शोषण केले. तेव्हा मी पाच वर्षांची होते. जेव्हा मला शाळा आणि विद्यापीठांमध्ये बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा मी हा प्रसंग विद्यार्थ्यांसोबत शेअर केला. यामुळे इतरांनाही अशा प्रसंगातून जावे लागले असेल तर त्यांना बळ मिळेलं, त्यांनी स्वतःला दोष न देता मोकळेपणाने समोर येण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना त्या पाठीमागे होती.'
एखाद्या अभिनेत्रीचे बालपणी लैंगिक शोषण होण्याची ही पहिली घटना नाहीये. यापूर्वीसुद्धा बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील काही अभिनेत्रींना या वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये अभिनेत्री कल्कि कोचलिन, तब्बू, राजेश खन्ना यांची लिव्ह इन पार्टनर अनिता अडवाणी, अभिनेत्री सोफिया हयात, प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांची कन्या अनुष्का, हॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती ओप्रा विन्फ्रे, पॉप सिंगर मॅडोना यांचे नाव सामील आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अभिनेत्रींविषयी..