आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ON A BIG DATE: शाहिद स्टारर \'शानदार\' दस-याच्या मुहूर्तावर होणार रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'क्वीन' सिनेमानंतर विकास बहलचा 'शानदार' सिनेमा बहुप्रतिक्षित सिनेमांपैकी एक आहे. विशेष म्हणजे या सिनेमात शाहिद कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदा या स्क्रिन शेअर करणार आहेत. 'फँटम' सिनेमाव्यतिरिक्त निर्माता म्हणून करण जोहरसुध्दा सिनेमाशी जुळलेला आहे.
4 सप्टेंबर रिलीज डेटमध्ये बदल करून त्यांनी सिनेमा पुढे ढकलला आहे. सिनेमा होण्यासाठी एक महिना दिरंगाई असल्याचे कळते. 22 ऑक्टोबरला हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे ठरले आहे. कारण या तारखेला येणारे चार वीकेंट मिळू शकतात.
गुरुवारी दस-याची सुटी असून सिनेमा याच दिवशी रिलीज होत आहे. शुक्रवारी अनेक अनेक भागांत बासी दसरा असल्याने त्या दिवशीदेखील सुटी येते. शनिवारी मुहरम आहे आणि रविवार ही हक्काची सुटी असते. चार दिवस लगातार सुट्या असल्याने सिनेमाला त्याचा फायदा होऊ शकतो. अशा योगायोगाने सिनेमा चांगलाच गल्ला जमावू शकतो. दुसरे वैशिष्ट म्हणजे, जुलै महिन्यात शाहिदचे लग्नदेखील आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, शूटिंग पूर्ण झाले आहे, परंतु पोस्ट-प्रोडक्शन आणि डबिंग बाकी आहे. लग्नासाठी शाहिदने कामातून ब्रेक घेतला तर त्याच्या संपूर्ण वर्षाचे शेड्यूल व्यस्त असू शकते. याच तारखेवर जॉन अब्राहमचा 'रॉकी हँडसम'सुध्दा रिलीज होऊ शकतो.
सुरुवातीला या तारखेला सुशांत सिंह राजपूतचा धोनी बायोपिक प्रदर्शित होणार होता. मात्र त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. नंतर या सोलो डेटवर अनेकांची नजर गेली. करणने 22 ऑक्टोबर अर्थातच दस-याच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज करण्याची घोषणा केली.