आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Om Puri Death Update: Shabana Azmi Spotted At Cooper Hospital, Celebs Clicked At Om Puri\'s House

ओम पुरींच्या दुसऱ्या पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या शबाना आझमी, हे कलाकारही पोहोचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - हॉस्पिटलमध्ये ओम पुरींची दुसरी पत्नी नंदिता पुरी, शबाना आझमीसुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. तर प्रकाश झा ओम पुरींच्या वर्सोवास्थित घरी पोहोचले. - Divya Marathi
डावीकडे - हॉस्पिटलमध्ये ओम पुरींची दुसरी पत्नी नंदिता पुरी, शबाना आझमीसुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. तर प्रकाश झा ओम पुरींच्या वर्सोवास्थित घरी पोहोचले.

मुंबईः बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 66 वर्षांचे होते. ओम पुरी यांचे पार्थिव मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर मुंबईतील वर्सोवा स्थित त्रिशूल अपार्टमेंटमधील त्यांच्या राहत्या घरी अंत्य दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  
कूपर हॉस्पिटलमध्ये ओम पुरी यांच्या दुस-या पत्नी नंदिता यांच्यासोबत अभिनेत्री शबाना आझमी उपस्थित आहेत. यावेळी भावूक झालेल्या शबाना यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला. 

ओम पुरी यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या घरी पोहोचले. दिग्दर्शक प्रकाश झा, अभिनेता दीपक डोबरियाल, मनोज पाहवा त्यांच्या बिल्डिंगबाहेर दिसले.  
 
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मालवली प्राणज्योत
ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांनी 100 हून अधिक हिंदी आणि 20 हून अधिक हॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. अर्ध सत्य आणि आरोहण या सिनेमांतील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1990मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काने गौरविण्यात आले होते. सध्या ते सलमान खानच्या ट्युबलाइट या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. 

पुढील स्लाईड्सवर बघा PHOTOS...   
बातम्या आणखी आहेत...