आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सून आकांक्षाच्या आरोपांचे युवराजच्या आईने केले खंडन, जाणून घ्या काय म्हणाल्या शबनम सिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बहुप्रतिक्षित बिग बॉसचे दहावे पर्व छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे. या शोचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच सेलिब्रिटींसोबत सामान्य लोकांना शोमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. १५ स्पर्धकांमध्ये गुडगावची राहणारी २५ वर्षीय युवती आकांक्षा शर्मा हिच्या नावाचा समावेश आहे. बिग बॉसच्या मंचावर येण्यापूर्वीपर्यंत आकांक्षाला कुणी ओळखत नव्हतं. मात्र ती या मंचावर आली आणि वादग्रस्त वक्तव्य करुन एका रात्रीतून प्रसिद्धीझोतात आली. ही युवती प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगच्या धाकट्या भावाची पत्नी आहे.
२०१४ मध्ये युवराजचा धाकटा भाऊ जोरावर सिंगसोबत आकांक्षाचे लग्न झाले होते. मात्र चार महिनेसुद्धा हे लग्न टिकू शकले नाही. बिग बॉसच्या मंचावर सलमानसमोर आपले दुःख व्यक्त करताना आकांक्षा भावूक झाली होती. नव-यापासून विभक्त होण्यामागे तिच्या सासूबाई आणि युवराज सिंगच्या मातोश्री शबनम सिंग जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप तिने केला. सासूच्या विचित्र वागण्यामुळे घर सोडल्याचे तिने सांगितले. आकांक्षा पुढे म्हणाली होती, की तिला फक्त लग्नापासून स्वातंत्र्य हवं आहे. यासाठी तिला पैसे किंवा युवराजच्या कुटुंबाकडून दुसरे काहीही नको. लग्नानंतर एक वेळ अशी आली होती, की जगण्यापेक्षा मरण बरं, असं तिला वाटू लागलं होतं. त्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी तिने आता बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय घेतला असल्याचेही आकांक्षा म्हणाली.
सूनेच्या आरोपांचे युवराजच्या आईकडून खंडन
हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राशी बोलताना शबनम सिंग यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्वप्रथम हे आकांक्षाचे या प्रकरणावर बोलणे योग्य नाही, तिला या विषयावर बोलण्याची परवानगी नाही. कारण, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मी याप्रकरणी एक खास याचिका दाखल केली आहे. याची सर्वांनाच माहिती असून सर्वचजण याबद्दलचा अजेंडा समजू शकतात. आम्हाला या प्रकरणी बोलण्याची परवानगी नाही’, असे शबनम सिंग म्हणाल्या.
आणखी काय म्हणाल्या शबनम सिंग, जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...