आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Forbes: सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील 100 सेलेब्समध्‍ये शाहरुख आणि अक्षय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - बॉलीवूडचे सुपरस्टार शाहरुख खान आणि अक्षयकुमार यांनी २०१६ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील १०० सेलिब्रिटींमध्ये स्थान मिळवले आहे. फोर्ब्जच्या या यादीत अमेरिकी गायिका टेलर स्विफ्ट अव्वल असून तिची कमाई १७ कोटी डॉलर आहे.
शाहरुख तीन कोटी ३० लाख डॉलरच्या कमाईसह जगातील १०० सेलिब्रेटींत ८६ व्या क्रमांकावर आहे, तर तीन कोटी १५ लाख डॉलर कमाईसह अक्षयकुमारने या यादीत ९४ वे स्थान पटकावले आहे. शाहरुख खान यशस्वी चित्रपटांतील आपल्या भूमिकांसह बॉलीवूडच्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहेत. चित्रपटात काम करण्यासाठीचे मानधन आणि अन्य मार्गांनीही त्यांची तगडी कमाई असल्याचे फोर्ब्जने म्हटले आहे.
ते डझनभर ब्रँडच्या जाहिरातीही करतात. अक्षयकुमारच्या यादीतील स्थानात घसरण झाली आहे. आधीच्या ७६ व्या क्रमांकावरून अक्षयकुमार ९४ व्या स्थानावर आले आहेत. बॉलीवूडमधील सर्वाधिक व्यग्र कलाकारांपैकी ते एक असून त्यांनी तीन हिट चित्रपटांसह चांगली कमाई केली आहे.
मोटारसायकल व सुवर्ण बचतीवर कर्ज देणाऱ्या कंपन्यांसह अनेक उत्पादनांच्या जाहिरातींतूनही अक्षयकुमारने चांगली कमाई केली आहे.
या यादीत लेखक जेम्स पॅटरसन तिसऱ्या, रिअल मॅद्रिदचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो चौथ्या, बॉस्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स ११, तर संगीतकार मॅडोना १२ व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील १०० जणांनी २०१५-१६ मध्ये पाच अब्ज १० कोटी डॉलरची अग्रिम भरल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.

काय म्‍हटले 'फोर्ब्स'ने...
> फोर्ब्सने म्हटले, शाहरुख बॉलीवूडच्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे.
> चित्रपटातील भूमिकेच्‍या मानधनाशिवाय जाहिरातीतूनही त्‍याचे उत्‍पन्‍न वाढले आहे.
> मात्र, गत वर्षीचा विचार केला तर यावर्षी अक्षयकुमारचे या यादीतील स्‍थान घसरले आहे.
> गत वर्षी तो 76 व्या क्रमांकावर होता. आता 94 व्‍या आहे.
> अक्षय हा बॉलीवूडमधील सर्वाधिक व्यग्र कलाकार असल्‍याची पुष्‍टीसुद्धा 'फोर्ब्स' जोडली.
किती आहे शाखरुख, अक्षयची कमाई ?
> 'फोर्ब्स'च्‍या यादीनुसार, शाहरुख खान याची कमाई तीन कोटी 30 लाख डॉलर आहे. त्‍यामुळे त्‍याला या यादीत 86 व्या क्रमांकावर स्‍थान मिळाले.
> अक्षयकुमारची कमाई 15 लाख डॉलर असून, तो 94 व्‍या स्थानी आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, हे सेलिब्रिटी आहेत आहेत कमाईत टॉप 10...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)