आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Believes Stars Should Cross Check Before Endorsing A Product

शाहरुख म्हणाला, एंडोर्स केलेल्या प्रॉडक्टच्या गुणवत्तेबाबत कलाकार जबाबदार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खानने सांगितले, की सेलेब्सनी कोणत्याही प्रॉडक्टची जाहिरात करण्यापूर्वी ती तपासून घ्यावी. - Divya Marathi
शाहरुख खानने सांगितले, की सेलेब्सनी कोणत्याही प्रॉडक्टची जाहिरात करण्यापूर्वी ती तपासून घ्यावी.
नोएडा: शाहरुख खानने कलाकारांना सल्ला दिला आहे, की एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यापूर्वी ती तपासून घ्यावी आणि क्रॉस चेकसुध्दा करावे. मात्र, त्याने असेही सांगितले, की सेलेब्सना प्रॉडक्टच्या दर्जासाठी पूर्णत: जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही.
आणखी काय म्हणाला शाहरुख...
- शाहरुख 'फॅन' सिनेमाच्या प्रमोशनसाठी नोएडाला आला होता. हा सिनेमा 15 एप्रिलला रिलीज होणार आहे.
- यावेळी माध्यमांनी त्याला विचारले, की जाहिरातींसाठी कलाकार किती जबाबदार आहेत?
- शाहरुख म्हणाला, कलाकारांकडे मर्यादीत प्रॉडक्टची माहिती असते. जसे, मला माहित नाही, एखादी कार कशी चालते. परंतु जाहिरात करण्यापूर्वी कंपनी, त्यांचा अनुभव याची माहिती नक्की घ्यावी.
- शाहरुख पुढे म्हणाला, कलाकारांची जबाबदारी आहे, की त्यांनी कोणतीही जाहिरात करण्यापूर्वी ती तपासूनच नव्हे तर क्रॉस चेक करून घ्यावे. तो म्हणाला, आधी इंस्टीट्यूट ही कामे करतात, कलाकार नंतर यात सामील होतात.
- शाहरुख म्हणाला, 'जर मी एखाद्या प्रॉडक्टवर आयएसआय मार्क पाहिले तर मी समजतो, की ती वस्तू निश्चितच चांगली आहे.'
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अनेक कलाकार अडकले वादात...