आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीच्या बिकिनी Photos वर SRKने तोडले मौन, मीडियाले दिले खरमरीत उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी सुहानासोबत शाहरुख खान - Divya Marathi
मुलगी सुहानासोबत शाहरुख खान
मुंबई. मार्चमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहानाचा फोटो मीडियामध्ये व्हायरल झाला होता. त्यात ती बिकिनीमध्ये भाऊ अबरामसोबत बीचवर दिसली होती. काही मीडिया हाऊसने त्यावर बातम्यासुद्धा केल्या होत्या. त्यात असे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आले होते, की सुहाना बिकिनीमध्ये बॉडीमध्ये शो करत होती. त्यावेळी शाहरुखने याविषयी काहीच सांगितले नव्हते. परंतु आता शाहरुखने आता मौन तोडले आहे.
शाहरुख म्हणाला, 'होय, तिने बिकिनी परिधान करून बीचवर दिसली होती. ती तिच्या धाकट्या भावासोबत होती. परंतु मीडियाने तिला या हेडलाइनने सादर केले होते, शाहरुखच्या मुलीने दाखवली बॉडी. हे खूप खालच्या थराचे वाटत नाही का? मला तर असेच वाटले. मी त्या वेबसाइटला संपर्क साधला आणि म्हटले, की तुमची वेबसाइट माझ्या मुलीच्या बिकिनी बॉडीने चालणार नाहीये. तुम्ही ती बातमी काढू शकता का. लोकांनी पाहिले आहे, मी कुठून आलो आहे. माझी मुलगी केवळ 16 वर्षांची आहे आणि तिच्याविषयी वेबसाइटने अशा हेडलाइन वापरणे थोडे विचित्र वाटले. आम्ही खूप लिबरल लोक आहोत. अशा गोष्टींनी फरक नाही पडत. परंतु हे खूपच विचित्र होते.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखचे सुहानासोबतचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...