Home »News» Shah Rukh Khan Car Ran Over A Photographer Leg

फोटोग्राफरच्या पायावरुन गेली शाहरुखची कार, वाचा पुढे काय घडले?

दिव्य मराठी वेब टीम | Mar 16, 2017, 15:50 PM IST


मुंबईः अभिनेता शाहरुख खान बुधवारी रात्री आलिया भटच्या 24 व्या बर्थडे पार्टीच्या निमित्ताने तिच्या घरी पोहोचला होता. पार्टीहून परतत असताना शाहरुखची कार एका फोटोग्राफरच्या पायावरुन गेली. शाहरुखने माणुसकीचे दर्शन घडवत जखमी झालेल्या फोटोग्राफरला तात्काळ नानवटी रुग्णालयात दाखल केले आणि आपल्या एका डॉक्टर मित्राला त्याच्यावर उपचार करण्याची विनंती केली. शिवाय त्याच्या औषधींचा खर्चही उचलला. रिपोर्ट्सनुसार, फोटोग्राफरला सुदैवाने जास्त दुखापत झाली नसून परिस्थिती अंडर कंट्रोल आहे.

फोटोग्राफरच्या अतिउत्साहामुळे घडली दुर्घटना...
एका प्रत्यक्षदर्शीनुसार, "फोटोग्राफर या फिल्डमध्ये नवीन आहे. तो शाहरुखला बघायला खूपच एक्साईडेट होता. त्याचे चांगले फोटोज कॅमे-यात क्लिक करण्याच्या तो प्रयत्नात होता. अशातच शाहरुखच्या ड्रायव्हरकडून गाडीचे चाक फोटोग्राफरच्या पायावरुन गेले. यावेळी शाहरुख अतिशय नम्र दिसला. फोटोग्राफरला दिलासा देत त्याच्यावर तातडीने उपचारांची सोय केली."

पुढील स्लाईड्सवर बघा, आलियाच्या पार्टीतील शाहरुखचे PHOTOS...

Next Article

Recommended