आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्या अबरामसोबत 'मन्नत'च्या बालकनीत दिसला शाहरुख, केक कापून केले सेलिब्रेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगा अबरामसोबत 'मन्नत'च्या बालकनीत शाहरुख, पत्रकारांसोबत बर्थडे सेलिब्रेट करताना शाहरुख. - Divya Marathi
मुलगा अबरामसोबत 'मन्नत'च्या बालकनीत शाहरुख, पत्रकारांसोबत बर्थडे सेलिब्रेट करताना शाहरुख.
मुंबईः अभिनेता शाहरुख खानने 2 नोव्हेंबर रोजी आपला 52वा वाढदिवस फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत अलिबाग येथे साजरा केला. त्यानंतर तो मुंबईत परतला आणि वांद्रा स्थित ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये मीडियासोबत केक कापून पुन्हा एकदा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर शाहरुख त्याच्या 'मन्नत'वर पोहोचला आणि बालकनीतून चाहत्यांना अभिवादन केले. शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचे असंख्य चाहते मन्नतबाहेर जमले होते. बालकनीतून चाहत्यांना भेट असताना शाहरुखचा चिमुकला मुलगा अबराम त्याच्यासोबत हजर होता. 

चाहत्यांची उसळली गर्दी...  
- शाहरुखची एक झलक बघण्यासाठी 'मन्नत'बाहेर चाहत्यांची गर्दी उसळली होती. शाहरुख शाहरुख म्हणून चाहते ओरडत होते. यावेळी अनेकांनी शाहरुखसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला. 
- शाहरुखने यंदाचा आपला वाढदिवस पत्नी गौरी आणि मित्रमंडळींसोबत अलिबागच्या बंगल्यावर साजरा केला. येथे वाढदिवस साजरा करुन शाहरुख फॅमिलीसोबत मुंबईत परतला. गेटवे ऑफ इंडियावर शाहरुख मुलगा अबराम, पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासोबत दिसला होता.
- अलीबागमध्ये शाहरुखच्या फॅमिलीशिवाय दीपिका, आलिया, करण जोहर, फराह खान, संजय कपूर, महीप कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा, सिद्धार्थ मल्होत्रा, चंकी पांडे आमि त्याची मुलगी अनन्या पांडे, संजय कपूरची मुलगी शनाया आणि सुझान खानसह अनेक बॉलिवूड सेलेब्स पोहोचले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, मन्नतमध्ये मुलगा अबरामसोबतची आणि मीडियासोबत बर्थडे सेलिब्रेशनची शाहरुखची छायाचित्रे..  
बातम्या आणखी आहेत...