आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shah Rukh Khan Got Angry At An Article Alleging He Was Asked To Sleep With Actress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुखने पत्रकाराला दिली होती नपुंसक करण्याची धमकी, यामुळे केला होता राडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूडमध्ये सर्वांशी हसून-खेळून राहाणारा अॅक्टर म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. तो प्रत्येकाची भेट घेतो, त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा करतो. मग ते फॅन्स असतील नाही तर मीडिया पर्सन. मात्र करिअरच्या सुरुवातीच्या काळात शाहरुख एका आर्टिकलने एवढा संतप्त झाला होता, की त्याने पत्रकाराला शिवीगाळ करत मारहाणीपर्यंत प्रकरण गेले होते. पत्रकाराच्या घरी जाऊन त्याला मारहाण करत, नपुंसक करण्याची धमकी शाहरुखने दिली होती. घाबरलेल्या पत्रकाराने शाहरुखविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिस स्टेशनमधूनही शाहरुखने धमकी दिली होती. 

मॅगझिनने छापले होते, इंटिमेट सीनच्या शुटिंग आधी शाहरुखने अॅक्ट्रेससोबत घालवली रात्र 

- ही घटना 1992 ची आहे. तेव्हा शाहरुख डायरेक्टर केतन मेहताची फिल्म 'माया मेमसाब' (1993) ची शुटिंग करत होता. या फिल्ममध्ये शाहरुखची अॅक्ट्रेस होती दीपा साही. फिल्ममध्ये शाहरुख आणि दीपा यांच्यात काही इंटिमेट सीन होते. 
- त्यावेळी मुंबईतील ग्लॅमर मॅगझीनने बातमी प्रकाशित केली होती की सीनच्या शुटिंग पूर्वी डायरेक्टर केतन मेहताने अॅक्ट्रेस दीपा साही (जी त्यांची पत्नी देखील आहे) ला मुंबईतील एका हॉटेलमध्ये शाहरुखसोबत एक रात्र घालवण्यास सांगितले होते. यामुळे दोघांमधील तणाव कमी होईल आणि ते सीन नॅचरली देतील. 
- मॅगझीनने पुढे हेही लिहिले, की डायरेक्टरची डिमांड पूर्ण करण्याची शाहरुख आणि दीपा यांनी तयारीही दर्शवली. दुसऱ्या दिवशी फक्त डायरेक्टर आणि सिनेमाटोग्राफर यांच्या उपस्थितीत सीन शूट झाला. 
- फिल्म क्रिटीक अनुपमा चोप्रा यांचे पुस्तक 'किंग ऑफ बॉलीवुड : शाहरुख खान अँड द सेडक्टिव वर्ल्ड ऑफ इंडियन सिनेमा' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, शाहरुखने पत्रकाराला काय-काय त्रास दिला... 

बातम्या आणखी आहेत...