आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRK म्हणाला, \'सोशल मीडियावर शिवीगाळ करणा-यांनी पत्ता सांगावा, घरी येऊन मारेल\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता शाहरुख खान सोमवारी (2 नोव्हेंबर) 50 वर्षांचा झाला. यानिमित्तावर त्याने मुंबईच्या ताज लेड्स अँडमध्ये मीडियीसोबत बातचीत केली. केक कटींग सेरेमनीनंतर शाहरुखने वादग्रस्त काही प्रश्नावर मनमोकळी चर्चा केली. यादरम्यान बीफ वादाशी निगडीत काही प्रश्नांवर त्याने सांगितले, 'मांस खाण्यावरून आपला धर्म कोणता हे ठरवू शकत नाही.' सोशल मीडियावर टिका करणा-यांवर शाहरुख म्हणाला, 'मला आी-बहिणीवरून शिवीगाळ केली जाते. मी त्यांना फक्त सांगेल, की नाव, मोबाईल नंबर आणि घराचा पत्ता सांगा. त्यांना घरी येऊन मारेन.' शाहरुखसोबत विविध विषयांवर माध्यमांनी बातचीत केली. त्याचेच काही अंश...
धर्माविषयी माझी मुले नेहमी गोंधळात असतात-
माझ्या घरात प्रत्येकजण स्वत:चा धर्मा स्वीकारण्यात स्वातंत्र्य आहे. माझी मुले दुविधावृत्तीत असतात, की ते हिंदू आहेत आणि मुस्लिम. मी म्हणतो, 'ईसाई का नाही?' कोणतीही असहनशीलता आपल्याला अंधकार युगाकडे घेऊन जाते.
देशभक्तीवर- लाज वाटते, की मला माझी राष्ट्रभक्ती सिध्द करावी लागत आहे. मी भारतीय आहे आणि कुणी यावर प्रश्न कसा उपस्थित करू शकतो. जे लोक म्हणतात, की मला त्या देशात पाठवा. परंतु मला या देशात राहण्याचा जेवढा हक्क आहे तेवढा इतर कुणालाच नाहीये. मी कुठेच जाणार नाहीये. माझे वडील स्वातंत्र्यासाठी लढले. त्यांनी मला जे दिले ते मी कुणालाच देणार नाही.
असहिष्णुतावर- जे पुरस्कार परत करत आहेत, ते धाडसी आहेत. मी त्यांच्यासोबत आहे. त्यांना इच्छा असेल, की मी मार्चमध्ये याऊन पत्रकार परिषद घ्यावी तर मी तयार आहे. माझे पुरस्कार परत करणे जरा जास्तच लक्षणीय होईल. विरोध करून एखादी गोष्ट परत करण्यावर माझा विश्वास नाहीये. शाहरुखने स्पष्ट सांगितले, की पुरस्कार परत करणारे लोक धाडसी आहेत मी त्यांच्यासोबत आहे.
एफटीआयआय- विद्यार्थी योग्य होते. काही शब्द आणि कृती चुकीच्या असू शकतात. तुम्ही प्रदर्शन आणि उपोषण करत असाल तर तुमच्या भावना अत्यंत तीव्र होतात. काही गोष्टी इकडे-तिकडे होतात. परंतु माझ्या मते, विद्यार्थी योग्य होते.
विरोधावर- माझ्याकडे एक मोठे हत्यार आहे, की चाहते माझ्यावर प्रेम करतात. जर कुणी माझ्या विरोधात गेले तर मोठ्या संख्येत लोक माझ्या बाजूनेसुध्दा आहेत. तुम्ही देशभक्त असाल तर तुम्ही देशातील प्रत्येक गोष्टीवर प्रेम करता. यात धर्म आणि क्षेत्राचा सामावेश नसतो.
धर्मनिरपेक्षतेवर- जर तुम्ही तीन खान्सना बोलून सिध्द करता, की भारत धर्मनिरपेक्ष आहे. तर असे नाहीये. भारत चमकतोय हे दाखवण्यासाठी खान चमकणे गरजेचे नाहीये.
'दिलवाले'-'बाजीराव मस्तानी' क्लॅशवर-
दोन्ही सिनेमे चांगले आहेत. 'बाजीराव मस्तानी'चा दिग्दर्शक, निर्माता अभिनेता, अभिनेते सर्वांना मी ओळखतो. एकाच दिवशी रिलीज होणारे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालावेत. शाहरुख-काजोलचा 'दिलवाले' आणि दीपिक-रणवीरचा 'बाजीराव मस्तानी' 18 डिसेंबरला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या इव्हेंटमधील शाहरुख खानचे फोटो...