आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्सच्या TOP 10 लिस्टमध्ये शाहरुख अव्वल स्थानी, वर्षभरात कमावले 257.5 Cr

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः फोर्ब्स या अमेरिकेच्या बिझनेस मॅगझिनने यंदाची टॉप 100 सेलिब्रेटींची यादी जाहीर केली असून, यात बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खान हा अव्वल स्थानी आहे. त्याने वर्षभरात 257.50 कोटी इतकी कमाई केली असून, दुस-या स्थानावर सलमानची वर्णी लागलीय. तर तिस-या स्थानी अमिताभ बच्चन आहेत. सलमान 202.75 कोटींची कमाई करुन दुस-या स्थआनवर आहे.
गेल्यावर्षी याच यादीत शाहरुख तिस-या स्थानी होता. फोर्ब्स यादी ही सेलिब्रेटींचे वर्षभरातील उत्पन्न आणि त्यांची प्रसिद्धी यावरून तयार करण्यात येते. प्रसिद्धीमध्ये शाहरुखला चौथे तर सलमान खानला दुसरे स्थान मिळाले आहे.
विशेष म्हणजे या यादीत मराठमोळे संगीतकार अजय-अतुल यांनाही स्थान मिळाले आहे. या यादीत त्यांचा 82 वा क्रमांक आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या फोर्ब्स यादीतील पहिले दहा सेलिब्रिटी...
बातम्या आणखी आहेत...