आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानचे स्पॉट बॉय सुभाष दादांचे निधन, अंत्यविधीला गौरी आणि आर्यनची उपस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुभाष दादांचे अंत्यदर्शन घेताना गौरी खान, इनसेटमध्ये सुभाष दादा)
मुंबईः अभिनेता शाहरुख खानचे स्पॉट बॉय सुभाष दादांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. शाहरुखची मॅनेजर करुणा बडवाल यांनी ही बातमी दिली आहे. त्यांनी ट्विट केले, "Spl r the workings of the universe..this pic got tweeted as Subhash Dada left for a better place today to RIP..pray!"
सुभाष दादा गेल्या 25 वर्षांपासून शाहरुखसोबत काम करत होते. 12 जुलै रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
सुभाष दादांच्या अंत्यविधीला शाहरुख खानची पत्नी गौरी आणि थोरला मुलगा आर्यन यांनी हजेरी लावली होती. शाहरुख सध्या 'दिलवाले' या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने बुल्गेरिया येथे आहे. त्यामुळे तो सुभाष दादांच्या अंत्यदर्शनाला येऊ शकला नाही.
पुढे पाहा, सुभाष दादांच्या अंत्यदर्शनाला पोहोचलेल्या शोकाकुल लोकांची छायाचित्रे...