आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसवर BMC ची कारवाई, चौथ्या मजल्यावरील कँटिन तोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख खानचे प्रोडक्शन हाऊस रेड चिलीजच्या इमारतीतील कँटिनवर कारवाई करण्यात आली आहे. बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पारेशन (बीएमसी) ने ही कारवाई केली आहे. चौथ्या मजल्यावर तयार करण्यात आलेले हे स्ट्रक्चर बेकायदेशीर होते, असे बीएमसीचे म्हणणे आहे. तर रेड चिलीकडून या कारवाईवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले आहे. या मुद्द्यावर बीएमसीबरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

बीएमसीने घेतली नव्हती परवानगी.. 
- न्यूज एजन्सीच्या बातमीनुसार बीएमसीच्या एका सिनिअर अधिकाऱ्याने सांगितले की, ही कारवाई चौथ्या मजल्यावर करण्यात आली. त्याठिकाणी बेकायदेशीररित्या एक कँटिन तयार करण्यात आले होते. त्यासाठी बीएमसीकडून परवानगी घेतलेली नव्हती. ही बिल्डींग गोरेगाव वेस्टमध्ये डीएलएक्स मॅक्स बिल्डिंगमध्ये आहे. 
- त्यांनी सांगितले की, हे स्ट्रक्चर सुमारे 2000 स्क्वेअर फुटावर तयार करण्यात आले होते. ते तोडण्यात आले आहे. 

वार्ड अधिकाऱ्यांकडे आली होती तक्रार 
- बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक वार्ड अधिकाऱ्यांना कँटिन बेकायदेशीर असल्याची तक्रार मिळाली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हे कँटिन तोडण्यात आले. 
- त्यांनी सांगितले की, म्युनिसिपल कमिश्नर किरण आचरेकर यांच्या देखरेखित कारवाई करण्यात आली. 

रेड चिलीज म्हणाले, आम्ही मालक नाही 
- रेड चिलिजच्या स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे की, 'रेड चिलीज वीएफएक्स याठिकाणी भाडेकरू आहे मालक नाही. या इमारतीत एक ओपन एरिया आहे, ज्याचा वापर भाडेकरू घरून आणलेले डबे खाण्यासाठी करतात. 
- हे ऑपरेशनल कँटीन नव्हते. बीएमसीने जो भाग पाडला त्यावर एनर्जी सेव्हींग सोलर पॅनल लावलेले होते. त्यामाध्यमातून संपूर्ण व्हीएफएक्स बिल्डींगला क्लीन एनर्जी मिळत होती. रेड चिलीज वीएफएक्स या मुद्द्यावर संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचेही सांगण्यात आले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...