आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...या कारणामुळे आपल्या मुलांना सेक्स एज्युकेशन देऊ शकत नाहीये शाहरुख खान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः जगभरात लोक लैंगिक शिक्षणावर उघडपणे बोलताना दिसतात. मात्र शाहरुख खान म्हणतो, की त्याला त्याची मुले आर्यन आणि सुहानासोबत या विषयावर बोलायला अवघडल्यासारखे होते. बॉम्बे टाइम्सला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत शाहरुखने हा खुलासा केला आहे. मुलांसोबतचे बाँडिंग शेअर करताना तो म्हणाला, "माझे माझ्या मुलांसोबत अतिशय फ्रेंडली रिलेशनशिप आहे. हे यासाठी होऊ शकले, कारण माझ्या वडिलांचे माझ्यासोबत असेच नाते होते." शाहरुखला त्याच्या आईने दिले होते सेक्स एज्युकेशन...

शाहरुखने मुलाखतीत सांगितले, "माझ्या आईने मला लैंगिक शिक्षणाविषयीची माहिती दिली होती. (हसून) मात्र मी हे माझ्या मुलांना देऊ शकत नाही. माझा स्वभाव खूप लाजाळू आहे, त्यामुळे मी माझ्या मुलांसोबत सेक्स या विषयावर बोलू शकत नाही. कधी कधी आम्ही एकत्र बसून सिनेमा बघतो, त्यावेळी मला खूप जागरुक राहावे लागले. होऊ शकतं, की मलाच माझ्या मुलांकडून क्लास घ्यावा लागेल."
मुलांना अपग्रेड करण्याविषयी....
मुलांना अपग्रेड करण्याच्या पॉलिसीविषयी शाहरुख म्हणतो, "माझी मुलांसाठी माझी एक अतिशय साधी फिलॉसफी आहे. दोन गोष्टी. ज्याविषयी मी कधीही काहीही विचारले नाही. एक म्हणजे ते काय करतात? कारण मला ठाऊक आहे, ते जे करतील ते योग्यच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 'मला ठाऊक नाही' म्हणण्याची क्षमता. उत्तर देण्यासाठी हा योग्य पर्याय आहे. जेव्हा शाळेत तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जातो, आणि जर तुम्हाला त्याचे उत्तर येत नसेल, तर ते अपमानजनक वाटू शकतं. मात्र एखादी गोष्ट ठाऊक नसणे, हे काही अपमानजनक नाही. वयाच्या 51 वर्षीसुद्धा मला अनेक गोष्टी ठाऊक नाहीत. माझा सेल्फ कॉन्फिडन्स खूप हाय आहे."
शाहरुख खान तीन मुलांचा वडील आहे. त्याचा सर्वात मोठा मुलगा आर्यन खान आता 19 वर्षांचा आहे. तर मुलगी सुहाना 16 वर्षांची आहे. धाकटा मुलगा अबराम तीन वर्षांचा असून त्याचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, मुलांसोबतचे शाहरुख आणि त्याची पत्नी गौरीचे काही PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...