आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख-सलमानसह या सेलिब्रिटींच्या सुरक्षेत मुंबई पोलिस करणार कपात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सलमान खान, शाहरुख खान, राजू हिराणी आणि विधू विनोद चोप्रा)

मुंबईः बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला मुंबई पोलिसांकडून पुरवल्या जाणा-या सुरक्षा व्यवस्थेत कपात होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने अलीकडेच शहरातील दिग्गज मंडळींना पुरवल्या जाणा-या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेल्यानंतर मुंबई पोलिस कमिश्नरकडे हा प्रस्ताव मांडला आहे. शाहरुख खानसह अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक राजू हिराणी आणि निर्माते विधू विनोद चोप्रा यांच्या नावांचाही या यादीत समावेश आहे. यापैकी काहीजण गँगस्टर रवी पुजारीच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळे त्यांना कडक सुरक्षा दिली गेली आहे.
शाहरुखचा मित्र मोरानीच्या घराबाहेर झाली होती फायरिंग
गेल्यावर्षी पोलिसांनी पुजारी गँगकडून मिळणा-या धमक्या बघता शाहरुख खान, आमिर खान आणि दिग्दर्शिका फराह खान यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. शाहरुख खानचा बिझनेस पार्टनर आणि मित्र अली मोरानीच्या वांद्र्यातील घराबाहेर पुजारी गँगच्या लोकांकडून तीन राउंड फायरिंग करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी शाहरुख खानची सुरक्षा वाढवली होती. एका वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमचे ऑडिट आणि अलीकडेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या या मंडळींना कोणताही धोका नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. शहरातील पुजारी गँगचा दबदबा कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. त्यांच्या गँगमधील अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे."
मुंबई पोलिस कमिश्नर घेणार अंतिम निर्णय
क्राइम ब्रांचच्यावतीने या मंडळींची सुरक्षा कमी करण्याचा प्रस्ताव मुंबईचे पोलिस कमिश्नर राकेश मारिया यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर या सेलिब्रिटींची सुरक्षा कमी करण्यात येईल. एका पोलिस अधिका-याने सांगितल्याप्रमाणे, "पोलिस कमिश्नर यावर अंतिम निर्णय देतील. जर त्यांनी सुरक्षा कमी करण्यास परवानगी दिली नाही, तर ती कायम राहिल."
शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांना दोन पोलिस एस्कॉर्ट आणि गाडी सुरक्षा देण्यात आली आहे. तर हिराणी, फराह खान आणि विधू विनोद चोप्रा यांना पोलिस गाडी देण्यात आली आहे.

पुजारीने दिली होती अनेक सेलिब्रिटींना धमकी
पुजारीने बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना धमकी दिली होती. छोटा राजन गँगसोबत नाते तोडल्यानंतर पुजारी गँगच्या वतीने वसुलीसाठी बॉलिवूड आणि उद्योगजगातीतल नामांकित लोकांना धमकी देण्यात आली होती. गेल्यावर्षी पुजारी गँगने शाहरुखची प्रॉडक्शन कंपनी रेड चिलीजच्या ऑफिसमध्ये फोन करुन धमकी दिली होती, की त्याने मोरानीसोबत काम करुन नये. क्राइम ब्रांचने गेल्याच महिन्यात पुजारी गँगच्या 13 सदस्यांना अटक केली होती. मुंबईत दबदबा कमी झाल्यानंतर या गँगने ठाणे आणि नवी मुंबईत आपला पसारा वाढवण्याचा प्रयत्न सुरु केला आणि अनेक बिल्डर्स आणि नेत्यांना धमकीवजा फोन केले.