आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Shooting Raees With Pakistani Actress In Ahmedabad

PAK अॅक्ट्रेससोबत SRKने केले शूटिंग, रविवारी कारवर झाली होती दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूटिंगदरम्यान शाहरुख खान आणि माहिरा खान - Divya Marathi
शूटिंगदरम्यान शाहरुख खान आणि माहिरा खान
अहमदाबाद- शाहरुख खान सध्या अहमदाबादमध्ये 'रईस' या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहे. सोमवारी (15 फेब्रुवारी) या सिनेमाच्या शूटिंगचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख येथील प्रसिध्द मस्जिद सरखेज रोजामध्ये काही सीन चित्रीत करताना दिसला. या फोटोंमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसुध्दा दिसत आहे.
रविवारी शाहरुखच्या कारवर झाली दगडफेक...
- रविवारी (14 फेब्रुवारी) सकाळी शाहरुख सिनेमाचे शूटिंग करत होता तेव्हा त्याच्या कारवर काही लोकांनी दगडफेक केली.
- या प्रकरणात सात लोकांना अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
- घटनेदरम्यान शाहरुख कारमध्ये नव्हता. तो शूटिंगमध्ये व्यस्त होता.
- यापूर्वी 'रईस' सिनेमाच्या शूटिंगसाठी गुजरातच्या भुजमध्येसुध्दा शाहरुखला विरोधाचा सामना करावा लागला होता.
- 3 फेब्रुवारीला भुजच्या खारी नदीच्या किना-यावर शूटिंग होणार होते. मात्र ते रद्द करण्यात आले होते.
- सध्या 'रईस'चे शूटिंग अहमदाबादमधील विविध लोकेशन्सवर सुरु आहे. शाहरुख शुक्रवारी (12 फेब्रुवारी) अहमदाबादला पोहोचला होता.
- यापूर्वी सिनेमाचे शूटिंग कच्छ जिल्ह्यात झाले.
कोण करत आहे विरोध?
- भुज, धोरडो आणि मांडवी बीचवर 'रईस'च्या शूटिंगचा विरोध व्हीएचपी करत आहे.
- शाहरुखने असहिष्णुतेवर दिलेल्या वक्तव्यामुळे असे घडत आहे.
- मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये वाढदिवसानिमित्त शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते, 'देशात असहिष्णुता वाढत आहे. जर मला एक सिम्बॉलिक गेस्चरच्या रुपात पुरस्कार परत कर तर मी करेल. देशात गतीने धर्मभेद वाढत आहे.'
काय आहे 'रईस'ची कथा...
- ‘रईस’ची स्टोरी अहमदाबादच्या बदनाम बुटलेगर (बेकायदेशीरित्या अमली पदार्थ विकणारा) लतीफवर आधारित आहे.
- लतीफ 2014मध्ये पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारल्या गेला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'रईस'च्या शूटिंगचे निवडक फोटो...