आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिलवाले'च्या शूटिंगसाठी रवाना झाला शाहरुख, एअरपोर्टवर दिसला नवीन लूकमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान गुरुवारी मुंबई विमानतळावर दिसला. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'दिलवाले' या सिनेमाच्या शूटिंगसाठी तो बुल्गारियाला रवाना झाला.
खास गोष्ट म्हणजे नेहमी क्लीन शेव्ह किंवा हलकीशी दाढी ठेवणारा शाहरुख खान यावेळी चक्क मिछीत दिसला. दिलवाले सिनेमासाठी शाहरुखने हा नवीन लूक केला आहे.
गेल्याच महिन्यात शाहरुखच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. याच कारणाने तो क्रचच्या मदतीने चालताना दिसला.
'दिलवाले'मध्ये शाहरुखसोबत काजोल, वरुण धवन, कृती सेनन आणि बोमन इराणी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. यावर्षी 25 डिसेंबरला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विमानतळावर क्लिक झालेली शाहरुखची निवडक छायाचित्रे...