आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅमे-यापासून अशाप्रकारे शाहरुखने केला चिमुकल्या अबरामचा बचाव, आमिर-आलियासुद्धा दिसले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता शाहरुख खान अलीकडेच मुंबईतील विमानतळावर त्याच्या धाकट्या मुलासोबत दिसला. विमानतळामध्ये शाहरुखने अबरामला उचलून घेतले होते. त्यावेळी अबराम शांत झोपी गेला होता. अबराम आणि शाहरुखला पाहताच प्रसारमाध्यमे आणि छायाचित्रकारांनी लगेचच त्यांचे कॅमेरे या सेलिब्रिटी बाप-बेट्यांचे फोटो काढण्यासाठी वळवले. या सर्व गोंधळामध्ये गाढ झोपी गेलेला अबराम काही क्षणांसाठी जागा झाला आणि लगेचच पुन्हा झोपी गेला.
प्रसारमाध्यमे आणि छायाचित्रकारांची गर्दी पाहता शाहरुखनेही अबरामची झोप मोड होणार नाही याची चांगलीच काळजी घेतली. यावेळी शाहरुख खान दिल्लीला त्याच्या आगामी ‘डिअर जिंदगी’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी निघाला होता. येत्या 25 नोव्हेंबरला हा शाहरुखचा हा सिनेमा रिलीज होणारेय. शाहरुख-अबराम यांच्या व्यतिरिक्त हे सेलिब्रिटीसुद्धा दिसले विमानतळावर...

यावेळी शाहरुखची को-स्टार आलिया भटसुद्धा विमानतळावर दिसली. शिवाय आमिर खान, संजय दत्त, हृतिक रोशन, अमिषा पटेल, गायक शान, आलिया भट, जॉन अब्राहम, सोनू सूद, रजनीकांत, रिया सेन हे स्टार्सही विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी संजय दत्त आणि आमिर खान यांच्या वेगळ्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, शाहरुख-अबराम आणि इतर बॉलिवूड स्टार्सचे यावेळी क्लिक झालेले फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...