Home »News» Shah Rukh Khan Talks About First Night Of Wedding

SRK ने सेटवरच घालवली होती लग्नानंतरची पहिली रात्र, गौरीचे अनेकदा झाले मिसकॅरेज

दिव्य मराठी वेब टीम | Jul 17, 2017, 14:41 PM IST

  • शाहरुख खान आणि गौरी खान.
मुंबई - शाहरुख खानला फिल्म इंडस्ट्रीमध्ये 25 वर्षे झाली आहेत. तेवढाच काळ शाहरूख आणि गौरीच्या लग्नालाही लोटला आहे. शाहरूखने नुकतेच एका इंटरव्ह्यूमध्ये शाहरूखने त्याच्या लग्नाबाबत आणि पत्नी गौरीबाबत अनेक खास गोष्टी शेयर केल्या. शाहरुखने सांगितले की, त्याने आणि गौरीने लग्नानंतरची पहिली रात्र चित्रपटाच्या सेटवर घालवली होती.

लग्न झाले त्याच दिवशी झाले होते मुंबईला शिफ्ट..
- शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले की, ज्या दिवशी आमचे लग्न झाले होते, त्याच दिवशी आम्ही मुंबईत शिफ्ट झालो होतो.
- आम्ही लग्नाची रात्र चित्रपटाच्या सेटवरच घालवली होती. पण तरीही गौरी काही म्हणाली नाही. मी गौरीशी असे काही बोलायचो की, ते मलाही काही समजत नव्हते. तरीही गौरीने माझी साथ सोडली नाही.
- शाहरुखच्या मते सुरुवातीची दोन-तीन वर्षे त्याला आणि गौरीला एकमेकांना समजून घेण्यात गेली होती. शाहरूख म्हणतो की, मी एक दिवस एवढा मोठा स्टार होईल हे त्याला वाटलेच नव्हते. कारण त्याला स्टारडमची व्याख्याच माहिती नव्हती.

आर्यनच्या जन्मापूर्वी झाले काही मिसकॅरेज
- शाहरुखने मुलाखतीत मुलांच्या बाबतही सांगितले. तो म्हणाला, माझी तीन मुले आहेत आणि तिघांची एक खास स्टोरी आहे. त्यामुळे तिघेही माझ्यासाठी खास आहेत.
- आर्यनच्या जन्मापूर्वी गौरीचे काही मिसकॅरेज झाले. त्याचा जन्म झाला त्यावेळीही दिवस फार कठीण परिस्थितीत गेले होते.
- सुहानाचा जन्म आमच्यासाठी जास्त आनंददायी होता. कारण पहिल्या वेळी आम्हाला मुलगी हवी होती, पण ती दुसऱ्या वेळी मिळाली.
- मुले माझ्यासारखी दिसावीत असे गौरीला वाटायचे. म्हणून ती डिलिव्हरीनंतर विचारायची की, बाळ तुझ्यासारखे दिसते का.
- अनेक वर्षांनी आम्हाला तिसरे बाळ हवे असे वाटले, तेव्हा आम्ही अबरामचे प्लानिंग केले.

घरात पार्टी होती आणि लाईटच नाही..
- शाहरुखने सांगितले की, 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' आणि 'कुछ कुछ होता है' त्याच्यासाठी खास आहेत.
- त्याचे कारण सांगताना शाहरूख म्हणाला, आम्ही 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' पाहिला त्यादिवशी गौरीचा वाढदिवस होता. आम्ही मन्नतमध्ये एक पार्टी होस्ट केली.
- त्यावेळी आम्ही घरात पूर्णपणे शिफ्ट झालेलो नव्हतो. त्यामुळे लाईट नव्हती. त्यामुळे करण जोहर आणि आदित्य चोप्राने मेणबत्ती पेटवली. तो फार सुंदर क्षण होता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, शाहरूख आणि गौरीची लव्ह स्टोरी..

Next Article

Recommended