आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SRKचे ऑपरेशन : 19 वर्षांत डोक्यापासून ते पायापर्यंत किंग खानवर झाल्या तब्बल 12 सर्जरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या डाव्या गुडघ्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांपासून शाहरुख गुडघ्याच्या दुखण्याने हैराण होता. अनेक औषधे आणि इंजेक्शनच्या माध्यमातून त्याने दुखणे कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुखणे वाढतच गेले. अखेर त्याने शस्त्रक्रियेचा मार्ग निवडला. शाहरुखला येत्या शनिवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल. डॉक्टरांनी त्याला महिनाभर विश्रांतीचा सल्ला दिला असून स्टंट्स करण्यासही मनाई केली आहे.
शाहरुख आणि दुखणे यांचे जुने नाते आहे. गेल्या 19 वर्षांत शाहरुखवर एक दोन नव्हे तर तब्बल 12 सर्जरी करण्यात आल्या आहेत.
1996 मध्ये बरगड्यांना दुखापत
'इंग्लिश बाबू देसी मेम'
या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. शाहरुखने लवकर बरे होऊन त्रिमुर्तीच्या शूटिंगला सुरुवात केली होती.
1997 मध्ये गुडघ्याला दुखापत
अरुणाचल प्रदेशमध्ये 'कोयला' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शाहरुखच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली होती. मात्र तरीदेखील त्याने शूटिंग सुरु ठेवले होते. शूटिंग संपल्यानंतर गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
पुढे वाचा, कधीकधी शाहरुखला दुखापत झाली आहे...