आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Was Doubt About The Word Gerua Amitabh Bhattacharya

'मोहे तू रंग दे' गाण्याचे गीतकार म्हणाले- गेरुआ शब्दावरुन चिंतीत होता शाहरुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मोहे रंग दे' गाण्यात काजोल आणि शाहरुख - Divya Marathi
'मोहे रंग दे' गाण्यात काजोल आणि शाहरुख
मुंबई - शाहरुख खान आणि काजोल यांचा 'दिलवाले' येत्या 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील 'रंग दे तू मोहे गेरुआ' गाणे पॉप्यूलर होत आहे. मात्र, शाहरुखला या गाण्यातील 'गेरुआ' शब्दाबद्दल थोडा संभ्रम होता, असा खुलासा गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी केला आहे.

अमितभा म्हणाला, शाहरुख विचारात पडला होता की प्रेक्षक या गाण्याबद्दल काय म्हणतील. ते कसा रिस्पॉन्स देतील ? कारण गेरुआ हा एक रंग आहे, ज्याला हिंदू धर्माशी संबंधित मानले जाते. देशात सुरु असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्यावर नुकतेच शाहरुखनेही वक्तव्य केले होते, त्यामुळे त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले होते.
शाहरुखला होती चिंता - गेरुआ शब्दावर कसे रिअॅक्ट होतील प्रेक्षक?
अमिताभ यांच्या म्हणण्यानुसार, 'किंग खान म्हणाला होता की गेरुआ शब्द तसा रोजच्या वापरतील नाही. मग प्रेक्षकांना तो कसा भावेल. गाण्यात ऐकायला तो चांगला वाटतो, पण त्याचा वापर कमी आहे.'