आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Khan Watched Kapil Sharma’S Debut Film With Dilwale Team

शाहरुखने 'दिलवाले'च्या टीमसोबत पाहिला कपिल शर्माचा पहिला सिनेमा, तोंडभरुन केले कौतूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून, वरुण धवन, वरुण शर्मा, कपिल शर्मा, शाहरुख खान आणि कृती सेनन - Divya Marathi
डावीकडून, वरुण धवन, वरुण शर्मा, कपिल शर्मा, शाहरुख खान आणि कृती सेनन
हैदराबादः सुपरस्टार शाहरुख खानने वरुण धवन, कृती सेनन आणि 'दिलवाले'च्या संपूर्ण टीमसोबत कॉमेडियन कपिल शर्माचा 'किस किस को प्यार करुं' हा सिनेमा पाहिला. या सिनेमाद्वारे कपिल मोठ्या पडद्यावर पदार्पण करतो. यासाठी हैदराबाद येथे सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. स्क्रिनिंगला सिनेमातील लीड हीरो अर्थातच कपिल शर्मा उपस्थित होता.
शाहरुखला कपिलचा सिनेमा पसंत पडला. त्याच्या मते, सिनेमा कॉमेडीने परिपूर्ण आहे. सिनेमा बघितल्यानंतर शाहरुखने दिग्दर्शक अब्बास-मस्तान या जोडीला धन्यवादही दिले. त्याने लिहिले, , "2 much fun watching KKPK. @KapilSharmaK9 @varunsharma90 it’s a laugh riot. Thanx for making me laugh so much. AbbasMastan lov u both."
सध्या शाहरुख हैदराबादमध्ये असून येथे तो आपल्या आगामी 'दिलवाले'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमात शाहरुख खान, वरुण धवन आणि कृती सेनन यांच्यासह काजोल मेन लीडमध्ये आहे. हा सिनेमा याचवर्षी म्हणजे 18 डिसेंबर रोजी रिलीज होणारेय.
नोटः कपिल शर्माचा डेब्यू सिनेमा असलेला 'किस किस को प्यार करुं' येत्या 25 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय. यामध्ये कपिलसह एली अवराम, मंजरी फडनीस, वरुण शर्मा आणि अरबाज खान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहरुखचे ट्विट्स आणि कपिल शर्मासोबत क्लिक झालेली शाहरुख आणि 'दिलवाले'च्या टीमची खास छायाचित्रे...