आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shah Rukh Khan’s Film Sets A New Record In Pakistan, Earns Rs. 50 Million In Three Days

शाहरूखच्या FAN ने तीन दिवसांत 52 कोटी कमावले, पाकिस्तानात केला रेकॉर्ड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बॉलिवूडचा किंग खान अर्थात सुपरस्टार शाहरूख खानचा सिनेमा 'फॅन'ची यशस्वी घौडदोड सुरु आहे. 'फॅन'ने ओपेनिंग विकेंडला अर्थात पहिल्या तीन दिवसांत 52 कोटींचा गल्ला जमवलाय. पाकिस्तानातील प्रेक्षकही शाहरूखच्या 'फॅन'चे फॅन झाले आहेत. सिनेमाने पाकिस्तानात देखील चांगला गल्ला जमवला आहे.

फॅनने पहिल्या दिवशी 19.20 कोटी, दुसर्‍या दिवशी 15.40 कोटी तर तिसर्‍या दिवशी 17.75 कोटींची कमाईसह बॉक्स ऑफिसवर एकूण 52.35 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. समीक्षकांनी 'फॅन'ला 3.5 स्टार दिले आहे.

ओपनिंग विकेंडमध्ये रग्गड कमाई करणारा फॅन पहिलाच...
ओपनिंग विकेंडमध्ये मोठी कमाई करणारा 'फॅन' यंदाचा पहिला सिनेमा ठरला आहे. शाहरुखच्या या सिनेमाने अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’चे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. 'एअरलिफ्ट'ने पहिल्या तीन दिवसांत 44.30 कोटी रुपयांची कमाई केली होती.

3500 स्क्रीन्सवर झळकला फॅन..
शाहरुखचा फॅन भारतात 3500 तर विदेशात 110 स्क्रिन्सवर रिलिज झाला आहे. किंग खानच्या या सिनेमाची प्रेक्षकांसह समीक्षकांकडून भरभरून प्रशंसा मिळवली आहे. 2016 वर्षातील शाहरुखचा हा पहिलाच सिनेमा आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, क्षणभरही विलचित होऊ न देणारा जबरा ‘FAN’चा REVIEW...
बातम्या आणखी आहेत...