आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shah Rukh Vs Salman: Two Stars Battled For Supremacy

शाहरुख Vs सलमान: एक 4 हजार कोटी तर दुसरा 1320 कोटींचा मालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. त्याच्या घराची सुरक्षादेखील वाढवण्यात आली आहे. त्याचा चिर प्रतिद्वंद्वी सलमान खान क्रिमिनल केसेसमुळे चर्चेत राहिला. त्यांचे आपसातील संबंधदेखील चर्चेत असतात. ते दोघे तीन चित्रपटांमध्ये (करण अर्जुन, हम तुम्हारे हैं सनम आणि कुछ कुछ होता है) एकत्र दिसले होते. आपापल्या गुण आणि दोषांनंतरही दोघेही नेहमीच लोकप्रिय राहिलेले आहेत. 
    
  शाहरुख खान सलमान खान
जन्म  2 नोव्हेंबर 1965 27 डिसेंबर 1965
कुटुंब  गौरी खान (पत्नी), तीन मुले   सिंगल
संपत्ती    4000 कोटी 1320 कोटी 
 
माइंडसेट आणि इमेज 
 
शाहरुख खान : \'मी इतरांपेक्षा अधिक टॅलेंटेड असल्याचे म्हणत नाही, पण मी निश्चितच आता अशा ठिकाणी पोहोचलो आहे, जिथे ठरावीक लोकच पोहोचण्यात यशस्वी होतात.\' असे मुलाखतीत शाहरुख खानने म्हटले होते. आपले मूल्य बॉलिवूड सुपरस्टारचे असल्याचे तो मानतो स्टेटस मेंटेनसाठी काहीही करू शकतो. स्पर्धेत टिकवून राहण्याच्या दबावातच पन्नाशीतही लागोपाठ चित्रपट करावे लागताहेत. शाहरुख कुटुंबाप्रति समर्पित, धनाप्रति सतर्क टीकाकारांसाठी कठोर आहे. 
 
सलमान खान  : \'माझी लोकप्रियता गेल्या वर्षांमध्ये वाढली आहे. ती मिळवण्यासाठी 20 वर्षांचा काळ लागला. स्टारडमही फॅन्सकडूनच मिळते\', ही बाब सलमान खानने मुलाखतीत सांगितली होती. लोकप्रियता, यशाचे श्रेय तो प्रेक्षकांना देतो. इतरांच्या भल्यासाठीही प्रसिद्धीचा उपयोग करतो. त्याने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यानेच आज बॉलिवूडमध्ये ते ओळख निर्माण करू शकले. एक चहरा आरोपीचा, तर दुसरा चॅरिटीतून इतरांना मदतीसाठी तत्पर व्यक्तीचा आहे. शाहरुखच्या तुलनेत नरम स्वभाव उत्तम सेन्स ऑफ ह्यूमर म्हणून ओळख.
 
शाहरुख-सलमानची संपत्ती, लोकप्रियता, टर्निंग पॉईंट आणि पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...