मुंबईः बॉलिवूडचा हॅण्डसम हंक शाहिद कपूरच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली आहे. याच महिन्यात म्हणजे 7 जुलै रोजी शाहिद दिल्लीची तरुणी मीरा राजपूतसोबत विवाहबद्ध झाला. पंजाबी पद्धतीने त्यांचे लग्न लागले. या लग्नाला केवळ 40 पाहुणे उपस्थित होते. शाहिद आणि मीराने मीडियाला लग्नापासून दूर ठेवले होते.
6 जुलै रोजी शाहिद आणि मीराच्या संगीत आणि हळदीची विधी पूर्ण झाली. या सेरेमनीत मीरा फिक्कट पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसली.
7 जुलै रोजी लग्नगाठीत अडकल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी गुडगाव येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शाहिद आणि मीराच्या कुटुंबीयांसाठी वेडिंग रिसेप्शन ठेवण्यात आले होते. त्यानंतर बी टाऊनमधील लोकांशी मीराचा परिचय व्हावा यासाठी त्याच्या आईवडिलांनी मुंबईतील हॉटेल पॅलेडियम येथे 12 जुलै रोजी वेडिंग रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला अमिताभ बच्चन यांच्यापासून ते दीया मिर्झा, श्रद्धा कपूर, जेनेलिया देशमुख, अर्जुन कपूर, रणवीर सिंहसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावून या नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शाहिद-मीराच्या हळदी, मेंदी, संगीतापासून लग्न आणि वेडिंग रिसेप्शनची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
चला तर मग एकुणच कसा रंगला शाहिद-मीराचा लग्नसोहळा बघण्यासाठी पाहा हा खास Wedding Album...