आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका, पाहा खास झलक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची तरुणी मीरा राजपूत लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. त्यांच्या लग्नपत्रिकांचे वाटप झाले आहे. त्यांच्या लग्नाचे कार्ड दिसायला साधारण मात्र आकर्षक वाटत आहे. हे हाय प्रोफाइल लग्न 7 जुलै रोजी गुडगांव येथे होणारेय. लग्नानंतर 12 जुलै रोजी मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. बातम्यांनुसार, मीराने इंडस्ट्रीतील लोकांची भेट घ्यावी, यासाठी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
रिसेप्शनसाठी पाहुण्यांची यादी तयार झाली असून यामध्ये शाहिदच्या एक्स गर्लफ्रेंड्सच्याही नावाचा समावेश आहे. करीना कपूर खान ('फिदा', 'जब वी मेट', 'चुप चुपके', '36 चाइना टाउन'), विद्या बालन ('किस्मत कनेक्शन'), प्रियांका चोप्रा ('कमीने', 'तेरी मेरी कहानी'), सोनाक्षी सिन्हा ('आर...राजकुमार') या सर्व अभिनेत्रींना शाहिदने आमंत्रित केले आहे. या चौघींसोबत शाहिदचे नाव जुळले होते. करीना आणि प्रियांकासोबत बराच काळ त्याचे अफेअर राहिले आहे.
पुढे पाहा, शाहिद-मीराच्या वेडिंग कार्डची खास झलक...