आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद कपूरचा अाज विवाह; दिल्लीत जाणार ५०० व-हाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्ली येथील मीरा राजपूत ७ जुलै रोजी लग्नगाठीत अडकणार आहेत. दिल्लीत होणा-या या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून लग्नासाठी ५०० व-हाडी येणार असल्याचे शाहिदच्या जवळच्या मित्रांनी सांगितले. दरम्यान, १२ जुलै रोजी मुंबईत ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.

करिना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिद कपूरचे दिल्लीच्या मीराशी प्रेमसंबंध जुळले. काही महिने दोघांनी याबाबत मौन बाळगले होते. मात्र, नंतर शाहिदनेच आपण लवकरच विवाह करणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दिल्लीत मंगळवारी हा विवाह सोहळा रंगणार आहे. शाहिदच्या विवाहाला कुटुंबीयांसह मित्र व बॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती राहणार आहे.

पुढे वाचा... स्वागतासाठी १५ प्रकारची जयपुरी पाने