आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीराला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, पहिल्यांदाच आपल्या चिमुकलीसोबत दिसला शाहिद कपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. शुक्रवारी (२६ ऑगस्ट) मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मीराने मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर रविवारी शाहिद पत्नी मीरा आणि आपल्या मुलीला घेऊन घरी आला. यावेळी शाहिदच्या कडेवर त्याची चिमुकली लेक दिसली. मात्र मुलीचा चेहरा स्पष्ट दिसू शकला नाही. यावेळी मीरा अगदी फिट दिसली.
- मीराला गुरुवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शाहिदचे वडील पंकज कपूर आणि सावत्र आई सुप्रिया तातडीने रुग्णालयात दाखल झाले होते.
- मीराची डिलिव्हरी शुक्रवारी संध्याकाळी ७.५६ मिनिटांनी झाली. मुलीचा जन्म प्रीमॅच्युअर आहे. मात्र डिलिव्हरी नॉर्मल झाली.
- गेल्या आठवड्यात मंगळवारी शाहिदने मीरासोबतचे एक छायाचित्र शेअर केले होते.
- शुक्रवारी शाहिदने ट्विट करुन मुलीच्या जन्माची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली.

फेक फोटो झाला होता व्हायरल...
- शाहिद-मीराची मुलगी हेल्दी असून २.८ किलोग्रॅम वजन आहे.
- शनिवारी मीरासोबत एका लहान बाळाचा फोटो व्हायरल झाला होता. तो फोटो त्यांच्या मुलीचा असल्याचे म्हटले गेले होते. मात्र तो फोटो फेक असल्याचे स्पष्ट झाले.

जुलै २०१५ मध्ये झाले होते शाहिद-मीराचे लग्न
- शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे लग्न ७ जुलै २०१५ रोजी नवी दिल्लीतील छतरपूर फार्महाऊसवर झाले होते.
- लग्नानंतर १२ जुलै रोजी मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिंटीसाठी ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवण्यात आले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, शाहिदची मुलगी आणि पत्नीसोबतची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...