आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : पाहा विना मेकअप कशी दिसते शाहिद कपूरची नववधू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत विदाउट मेकअपमध्ये)

दिल्ली- बॉलिवूडचा हॅण्डसम हंक शाहिद कपूर 7 जुलै रोजी विवाहबंधनात अडकला. मुळची दिल्लीची असलेल्या मीरा राजपूत या तरुणीसोबत शाहिद पंजाबी पद्धतीने विवाहबद्ध झाला. लग्नानंतर हे नवदाम्पत्य मुंबईत दाखल झाले. शाहिदच्या मुंबईतील घरी मीराचा गृहप्रवेश झाला. 7 जुलै रोजी नववधूच्या रुपात अतिशय सुंदर दिसणारी मीरा दुस-या दिवशी विदाऊट मेकअप कॅमे-यात क्लिक झाली. यावेळी मीरा खूपच साध्या लूकमध्ये दिसली. तिने ब्लॅक अँड व्हाइट कुर्ता परिधान केलेला होता. यावेळी हे नवदाम्पत्य हातात हात घालून दिसले.
आता उद्या म्हणजे 12 जुलै रोजी मुंबईत यांच्या ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलिवू़ड सेलिब्रेटी उपस्थित राहणार असल्याचे कळते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहिद-मीराची क्लिक झालेली खास छायाचित्रे..