आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास आहे शाहिद-मीराच्या लाडक्या लेकीचे नाव, जाणून घ्या काय आहे त्याचा अर्थ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी मिशासोबत शाहिद कपूर, शेजारील छायाचित्रात मीरा राजपूत - Divya Marathi
मुलगी मिशासोबत शाहिद कपूर, शेजारील छायाचित्रात मीरा राजपूत
मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो शाहिद कपूर आणि मीरा यांनी काहीच दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. नुकतंच बाळाचं नामकरण करण्यात आलं असून तिचं नाव ‘मिशा’ असं ठेवण्यात आलं आहे. मीराचा ‘मि’ आणि शाहिदचं ‘शा’ ही आद्याक्षरं एकत्र करुन हे नाव ठेवण्यात आलं आहे.
‘मिशाने बाबांना कुठेही जाणं अशक्य केलं आहे’ अशा अर्थाचं ट्वीट शाहीदने केलं आहे. मिशा या शब्दाचा अर्थ ‘देवासारखा’ असल्याची माहिती आहे. शाहिद-मीरा यांच्या नावाचं मिलाफ साधत हे नाव ठेवण्यात आलं आहे. शाहिद आणि मीरा यांना 26 ऑगस्टला मुलगी झाली. त्यावेळीही ट्वीट करुन शाहिदने आपला आनंद व्यक्त केला होता. ‘आणि ती आली आहे… आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद’ असं शाहिदने म्हटलं होतं.
मीशा हे एक रशियन नाव आहे. यापूर्वी राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनीही दोघांच्या नावांची आद्याक्षरं जुळवून ‘आदिरा’ असं लेकीचं नाव ठेवलं होतं. शाहिद आणि मीरा गेल्यावर्षी 7 जुलै रोजी लग्नाच्या बेडीत अडकले. शाहिद मीरापेक्षा वयाने 13 वर्षे मोठा आहे. शाहिदसोबत लग्नास मीरा सुरुवातीला तयार नव्हती. वयातील मोठे अंतर याचे कारण होते. मात्र थोरल्या बहिणीने समजूत घातल्यानंतर मीरा शाहिदसोबत लग्नास तयार झाली. शाहिद आता 34 वर्षांचा तर मीरा 21 वर्षांची आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, शाहिद-मीराचे काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...