आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Mira Grand Reception At Hotel Palladium Today

आज शाहिद-मीराचे रिसेप्शन, स्पेशल सिक्युरिटी पासने होणार पाहूण्यांनी एंट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या रिसेप्शनची निमंत्रण पत्रिका आणि इन्सेटमध्ये शाहिद-मीरा)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची मीरा राजपूतच्या लग्नाचे रिसेप्शन रविवारी अर्थातच 12 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. रिसेप्शन मुंबईच्या लोअर परेल परिसरात स्थित पॅलेडेयिम हॉटेलमध्ये होणार आहे. रिसेप्शनच्या निमंत्रण पत्रिका रविश कपूरने डिझाइन केल्या आहेत. त्यांनी शाहिदच्या लग्नाच्यासुध्दा निमंत्रण पत्रिका तयार केल्या होत्या. निळ्या रंगाची निमंत्रण पत्रिका अगदीच आकर्षक दिसत आहे. त्यामध्ये क्रोम प्लेटेड रिमूव्हेबल इनव्हिटेशन आहे, ही निमंत्रण पत्रिका घेऊन पाहूण्यांना रिसेप्शनमध्ये पोहोचावे लागेल. ही निमंत्रण पत्रिकाच पाहूण्यांचा गेटपास असेल. निमंत्रण पत्रिकेशिवाय कुणालाही आत प्रवेश दिला जाणार नाहीये. लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेप्रमाणेच यामध्येसुध्दा 'नो गिफ्ट प्लीज, ब्लेसिंग ऑनली' असे लिहिले आहे. गेल्या मंगळवारी (7 जुलै) शाहिद आणि मीरा गुडगावमध्ये लग्नगाठीत अडकले.
वेन्यूचे डिझाइन आणि मेन्यू-
रिसेप्शनचे स्थळ विवाह वेडिंग डेकोर कंपनीची स्टायलिस्ट रचना लकनोवाला डिझाइन करणार आहे. तिने सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या रिसेप्शनचा वेन्यूसुध्दा डिझाइन केला होता. दिल्लीमध्ये शाहिदच्या लग्नात केवळ शाकाहारी पदार्थ ठेवण्यात आले होते. तसेच मुंबईमध्ये होणा-या या रिसेप्शनमध्ये दोन्ही प्रकारचे (शाकाहारी-मांसाहारी) पदार्थ सर्व्ह केले जाणार आहेत.
40 पाहूण्यांच्या उपस्थितीत झाले लग्न-
शाहिद-मीरा 7 जुलै रोजी सकाळी जवळपास 11 वाजता पंजाबी परंपरेनुसार लग्नगाठीत अडकले. लग्नाच्या सर्व विधी दिल्लीच्या छतरपूर परिसरात स्थित एका फार्महाऊसमध्ये पार पडल्या. बातम्यांनुसार, सेरेमनीदरम्यान केवळ 40 पाहूणे उपस्थित होते, त्यामध्ये शाहिद आणि मीराचे कुटुंबीय आणि नातेवाईक सामील होते. लग्नानंतर शाहिद-मीरा माध्यमांसमोर आले.
यादरम्यान शाहिदने कुणाल रावलने डिझाइन केलेली शेरवानी परिधान केलेली होती, तसेच मीरा डिझाइनर अनामिका खन्नाच्या बेबी पिंक लहंगामध्ये दिसली. त्यानंतर मीराच्या कुटुंबीयांनी मंगळवारी संध्याकाळीच गुडगाव येथील ऑबेरॉय हॉटेलमध्ये रिसेप्शन दिले. या रिसेप्शनमध्ये केवळ नातेवाईकांना निमंत्रण देण्यात आले होते. गुडगाव येथे झालेल्या रिसेप्शनमध्ये जवळपास 250 पाहूणे सामील झाले होते. यावेळी फक्त शाकाहारी पदार्थ ठेवण्यात आले होते. कारण शाहिद-मीराचे कुटुंबीय राधा स्वामी सत्संग ग्रुपचे सदस्य आहेत. शिवाय अनेक जयपूरी पानसुध्दा रिसेप्शनमध्ये होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहिद-मीराच्या लग्नाचे काही फोटो...