आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीरा म्हणाली, 'आईवडिलांना वाटले होते शाहिद नव्हे त्याच्या लहान भावाचे आले आहे स्थळ'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता शाहिद कपूर पहिल्यांदाच पत्नी मीरा राजपूतसोबत एखाद्या चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. रविवारी रात्री टेलिकास्ट  झालेल्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये दोघांनी त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते अगदी त्यांच्या लग्नाच्या निर्णयापर्यंतचा प्रवास उलगडला. यावेळी त्यांच्या बोलण्यातून काही गमतीदार किस्से ऐकण्याची संधी तर प्रेक्षकांनी मिळालीच. पण, ‘अरेंज्ड मॅरेज’ का करावे याची काही कारणेही बॉलिवूडच्या या धम्माल जोडीने दिली.
 
मीरापेक्षा शाहिद 13 वर्षांनी मोठा आहे. त्यामुळे जेव्हा शाहिदच्या घरुन मीरासाठी स्थळ आले, तेव्हा मीराचे कुटुंबीय थोडे कन्फ्यूज झाले होते. याचा खुलासा करताना शाहिदने सांगितले. "मीराच्या आईला वाटले होते, माझ्या धाकट्या भावाचे (रुहान कपूर) स्थळ मीरासाठी आले आहे. मीरा आणि रुहान एकाच वयाचे आहेत. त्यामुळे हे कन्फ्युजन होणे स्वाभाविक होते. माझ्यासाठी मीराला विचारणा होतेय, याचा कल्पनाच मीराच्या आईवडिलांना नव्हती." पुढे मीरा सांगते, "वयामुळे शाहिद या कॅटेगरीतून एलिमिनेट होता.  खरं तर एज फॅक्टर नसतो. वय केवळ आकडा आहे." 
 
पुढे वाचा, आणखी कोणकोणती गुपितं उघड केली शाहिद-मीराने...
 
बातम्या आणखी आहेत...