आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Kapoor Will Not Work In Ekta Kapoor Film Triple X

शाहिदने एकता कपूरच्या 'ट्रिपल एक्स'चा प्रस्ताव धुडकावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहिद कपूरच्या करिअरला आयर्न्सच्या म्युझिक अल्बमच्या 'आँखो में तेरा चेहरा' गाण्यापासून सुरुवात झाली होती. त्यावेळी त्याचे वय साधारण 17 वर्षे होते. दिग्दर्शक केन घोष यांनी 'इश्क विश्क'द्वारे शाहिदला चित्रपटसृष्टीत लाँच केले होते. या घोषनी आपल्या आगामी 'ट्रिपल एक्स' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेसाठी शाहिदला प्रस्ताव पाठवला होता, असे सूत्रांनी सांगितले आहे. कथितरीत्या शाहिदने मात्र डेट्स नसल्याचे कारण पुढे करत हा प्रस्ताव नाकारला. एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहे.
चित्रपटाचे सुरुवातीचे पोस्टर इतके बोल्ड होते की, आजयर्पंत हिंदी चित्रपटामध्ये असे पोस्टर पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे देखील शाहिदने हा चित्रपट नाकारला असावा. आता नवोदित कलाकारांची चित्रपटामध्ये निवड करण्यात आली असून या चित्रपटाच्या कंटेंट, दृश्याला हाय सिक्युरिटी देण्यात आली आहे. दर दिवसाचे चित्रपटाचे शूटिंग रात्री कडेकोट बंदोबस्तामध्ये फुटेज लॅबमध्ये नेले जाते. पुढच्या दिवसाच्या फुटेजला पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओमध्ये नेण्यासाठीदेखील प्रॉडक्शन हाऊसच्या टीमसोबत काही सुरक्षारक्षक तैनात करण्यात येतात. शूटिंगच्या प्रत्येक शेड्यूलला भरपूर संरक्षण आणि सेफ्टी पासवर्ड देण्यात आला आहे.