आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Kajol Starrer 'Dilwale' First Look Poster

18 डिसेंबरला रिलीज होणार SRK-काजोलचा 'दिलवाले', समोर आले Poster

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('दिलवाले'च्या फस्ट लूकमध्ये शाहरुख-काजोल)
एन्टरटेन्मेंट डेस्कः शाहरुख खान आणि काजोल देवगण स्टारर 'दिलवाले' या आगामी सिनेमाचा फस्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये एसआरके आणि काजोलची जोडी बरीच रिफ्रेशिंग वाटत आहे. काजोल आणि शाहरुख एकमेकांची साथ एन्जॉय करताना दिसत असून शेजारी एक व्यक्ती व्हायलिन वाजवताना दिसतोय.
ही सुपरहिट जोडी बुलगारिया येथे रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाचे शूटिंग करत आहे. फोटोत शाहरुख व्हाइट शर्ट, ग्रे जॅकेट आणि कार्गोमध्ये दिसत आहे. काजोलने डेनिम शर्ट आणि प्रिंटेड लाँग स्कर्ट कॅरी केले आहे.
मंगळवारी शाहरुख खानने सिनेमाचा फस्ट लूक ट्विटरवर शेअर करुन ट्विट केले. “@RedChilliesEnt: Get ready for #DILWALE this December, Rohit Shetty Ishtyle! #Dilwale18Dec”
यावर्षी 18 डिसेंबरला रिलीज होणा-या या सिनेमात शाहरुख आणि काजोलसह वरुण धवन आणि कृती सेनन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'दिलवाले'च्या पोस्टरचे आणखी काही फोटोज...