आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने या अंदाजात अनुष्काला खाऊ घातले बनारसी पान, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - शाहरुख खाना आज 52वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने divyamarathi.com सांगत आहे शाहरुखच्या वाराणसी व्हिजिटबद्दल. ऑगस्टमध्ये शाहरुख - अनुष्काचा 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या फिल्मच्या प्रमोशनसाठी दोघेही वाराणसीला आले होते. यावेळी शाहरुखने अनुष्काला 'बनरसी मघई पान' खाऊ घातले होते. यावेळी त्यांनी मनोज तिवारीच्या भोजपुरी गाण्यांवरही ठुमके लगावले होते. 
 
दोघांनी एकमेकांना खाऊ घातले पान 
- काशीमध्ये सतीश शेठ यांच्या 'तांबूल पान भंडार' येथे शाहरुख आणि अनुष्काने एकमेकांना पान खाऊ घातले होते. 
- यावेळी हर-हर महादेवच्या नाऱ्याने शाहरुख आणि अनुष्काचे स्वागत झाले होते. त्यानेही हात उंचावून सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार केला होता. 
 
काय आहे मघई पानचे वैशिष्ट्य 
- मघई पान हे पांढरे पिकलेले पान असते, याच्या विड्यावर चांदीचा वर्ख लावला जातो. यात केसर, कात, चुना, सुपारी, गुलकंद, सोफ, इलायची, मिठी सुपारी, हिरा-मोती, गुलाब जल आणि लवंगसह स्पेशल चौघडा असतो. 
- याआधी 2006 मध्ये फिल्म डॉनमध्येही अॅक्टरने बनारसी पानाचा आस्वाद घेतला होता. मात्र काशीला येऊन बनारसी पानाचा आनंद घेण्याची मजाच काही और असते. त्यामुळेच वाराणसीला पोहोचल्याबरोबर शाहरुखने सर्वात पहिले पान खाऊन तोंड गोड केले आणि नंतर फिल्मचे प्रमोशन केले होते. 
- इम्तियाल अली दिग्दर्शित या फिल्ममध्ये शाहरुखने एका पंजाबी तरुणाची भूमिका - हॅरी साकारली होती. 
बातम्या आणखी आहेत...