आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रईस\'च्या शूटिंगमध्ये शाहरुखच्या कारवर दगडफेक, लावले हाय-हायचे नारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादमध्ये हॉटेलच्या पार्किंगमध्ये शाहरुख खानच्या कारवर दगड फेकताना काही लोक. व्हिडिओमधून घेण्यात आलेले फोटो. - Divya Marathi
अहमदाबादमध्ये हॉटेलच्या पार्किंगमध्ये शाहरुख खानच्या कारवर दगड फेकताना काही लोक. व्हिडिओमधून घेण्यात आलेले फोटो.
अहमदाबाद- 'रईस' सिनेमाचे शूटिंग करताना शाहरुख खानच्या कारवर रविवारी (14 फेब्रुवारी) दगडफेक झाली. अहमदाबादमध्ये शूटिंग सेटच्या बाहेर उभी असलेल्या कारची काही लोकांनी तोडफोड केली. यादरम्यान शाहरुख हाय-हाय असे नारेदेखील लावण्यात आले. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्येसुध्दा शाहरुखचा विरोध झाला होता.
भुजमध्ये थाबवले होते 'रईस'चे शूटिंग...
- यापूर्वी 'रईस' सिनेमाच्या शूटिंगसाठी गुजरातच्या भुजमध्येसुध्दा शाहरुखला विरोधाचा सामना करावा लागला होता.
- 3 फेब्रुवारीला भुजच्या खारी नदीच्या किना-यावर शूटिंग होणार होते. मात्र ते रद्द करण्यात आले होते.
- सध्या 'रईस'चे शूटिंग अहमदाबादमधील विविध लोकेशन्सवर सुरु आहे. शाहरुख शुक्रवारी (12 फेब्रुवारी) अहमदाबादला पोहोचला होता.
- यापूर्वी सिनेमाचे शूटिंग कच्छ जिल्ह्यात झाले.
कोण करत आहे विरोध?
- भुज, धोरडो आणि मांडवी बीचवर 'रईस'च्या शूटिंगचा विरोध व्हीएचपी करत आहे.
काय आहे 'रईस'ची कथा?
- ‘रईस’ची स्टोरी अहमदाबादच्या बदनाम बुटलेगर (बेकायदेशीरित्या अमली पदार्थ विकणारा) लतीफवर आधारित आहे.
- लतीफ 2014मध्ये पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारल्या गेला होता.
शाहरुखने असहिष्णुतेवर काय वक्तव्य दिले होते...
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये वाढदिवसानिमित्त शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते, 'देशात असहिष्णुता वाढत आहे. जर मला एक सिम्बॉलिक गेस्चरच्या रुपात पुरस्कार परत कर तर मी करेल. देशात गतीने धर्मभेद वाढत आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शूटिंगचे PHOTOS...