आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदच्या दिवशी मुलगा अबरामसोबत मन्नतच्या बालकनीत दिसला शाहरुख, चाहत्यांची घेतली भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः ईदच्या निमित्ताने अभिनेता शाहरुख खानने मुलगा अबरामसोबत चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. मन्नतच्या बालकनीत चिमुकल्या अबरामसोबत शाहरुख पोहोचला होता. चाहत्यांना हात दाखवून शाहरुख आणि अबरामने त्यांचे अभिवादन केले. यावेळी दोघेही व्हाइट कलरच्या कुर्ता-पायजामात दिसले. अबरामनेदेखील चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या निमित्ताने शाहरुख दरवर्षी आपल्या चाहत्यांची भेट घेत असतो. यावेळी शाहरुखने पत्रकारांसोबतही गप्पा मारल्या.  

अबरामला पसंत आहे वडिलांच्या चाहत्यांची भेट घेणे...
काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने एका मुलाखतीत सांगितले होते, 'अबरामला माझ्या चाहत्यांना भेटायला आवडतं. जेव्हाही एखादे निमित्त असतं, किंवा सिनेमा रिलीज होणार असतो, तेव्हा तो माझ्यासोबत चाहत्यांना भेटत असतो. माझ्यासोबत बालकनीत उभे राहायला तो नेहमी तयार असतो. जर मी चाहत्यांना भेटायला जराही उशीर लावला, तर तो त्यांना भेटण्यासाठी माझ्याकडे घाई करतो.' 

शाहरुख खान लवकरच 'जब हॅरी मेट सेजल' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा यावर्षी 4 ऑगस्टला रिलीज होतोय. दिग्दर्शक इम्तियाज अलींच्या या सिनेमात शाहरुख खानसोबत अनुष्का शर्मा मेन लीडमध्ये आहे.  

पुढील स्लाईड्सवर बघा, शाहरुख आणि अबरामचे फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...