आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पत्रकाराने सांगितले - 'शाहरुखला पक्के माहित असेत उद्याची हेडलाइन काय असेल'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुखचे मीडियासोबतचे नाते धुप-छांव सारखे राहिले आहे. ज्येष्ठ सिने पत्रकार रामचंद्र श्रीनिवासन यांचे मत आहे, की शाहरुख त्या कलाकारांपैकी एक आहे ज्याला स्वतःबद्दल उद्या मीडियात काय छापून आले पाहिजे आणि चांगली हेडलाइन्स कशी बनवतात हे कळते. एक काळ असा होता की शाहरुखचे मीडियासोबतचे संबंध फार चांगले नव्हते. काही लोकांनी तर त्याच्यावर अघोषित बहिष्कार टाकला होता. तेव्हा त्यानेही मीडियासोबत असेच धोरण आवलंबले होते. 
रामचंद्र सांगतात, 'मला चांगले आठवते त्याच्या कभी हां, कभी ना च्या सेटवर फिल्मचे प्रोड्यूसर विक्रम महरोत्रा यांनी मला बोलावले होते. त्यांनी शाहरुखची ओळख करुन दिली, तेव्हा शाहरुखने मला विचारले होते, की तुमच्याकडे प्रेस कार्ड आहे का? तो असा काळ होता जेव्हा शाहरुख मीडियापासून सावध वागत होता. आणि आज अशी परिस्थिती आहे की अनेक पत्रकारांच्या नजरेत शाहरुख असा ब्ल्यू-आय बॉय आहे जो सर्वांच्या आवडीचा आहे. आज शाहरुखला हेही माहित असते की कोणत्या पत्रकाराची पुढची स्टोरी काय असेल आणि त्याच्याबद्दलची त्याची हेडलाइन काय असेल.'
 
शाहरुखला चांगले माहित आहे की मीडियाला कसे खुश करायचे आणि त्याच्या फॅन्सचीही तो काळजी घेतो. रामचंद्र सांगतात, 'एकदा मी शाहरुखचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेलो होतो. त्याने मला स्वतःच्या कारमध्ये बसवून घेतले. तो त्याच्या कामावर निघालेला होता. शाहरुखने कारच्या खिडकीची काच खाली केली आणि फॅन्ससोबत हस्तांदोलन करत त्यांना भेटत तो पुढे निघाला.' रामचंद्र सांगतात, की शाहरुख खानची सफलता हे त्याच्या कठीण परिश्रमाचे फळ आहे. त्याला जे यश पाहिजे होते ते त्याला मिळाले आहे आणि आता तो ते एंजॉय करतो. 
आज शाहरुखचे जे घर 'मन्नत' आहे, ते कधीखाली शुटिंग स्पॉट होते. शाहरुख प्रथम जेव्हा येथे आला तेव्हाच त्याने हे घर खरेदी करण्याचा निश्चय केला होता. तेव्हा तिथे अनुपम खेर आणि अर्चना पुरनसिंह यांच्या फिल्मचे शुटिंग सुरु होते. 

रामचंद्र सांगतात, त्याच्या यशाचे श्रेय हे एखाद्याच्या गर्लफ्रेंड किंवा पत्नीच्या मागे पळण्याच्या सवयीला दिले जाऊ शकते. कारण त्याने डर, अंजाम, डीडीएलजे, कुछ कुछ होता है, आणि दिल तो पागल है सारख्या फिल्ममध्ये हेच कॅरेक्टर प्ले केले आहे. तो मुलींना नेहमी म्हणतो की तुझी निवड ही एकदम चूक आहे, आणि तुझ्यासाठी फक्त मीच परफेक्ट मुलगा आहे. कारण त्याचा प्रयत्न हा नेहमी एक चांगला बॉयफ्रेंड, चांगला पती आणि चांगला लव्हर बनण्याचे असतात. 
 
सलमान, अक्षय, अजय एकच तिकीट विकेत होते, तर शाहरुखने दोनची विक्री केली... 
- सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण हे त्यांच्या फिल्मचे एकच तिकीट विक्री करण्यात यशस्वी होत होते, तेही अशा मुलांना ज्यांना अॅक्शन आणि फाइट पाहायला आवडते. त्याचवेळी शाहरुख एकाचवेळी दोन तिकीट विकण्यात यशस्वी झाला होता. त्याला माहित होते, की मुलगी सोबत तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन येईल आणि त्याला दाखवेल, की मला याच्यासारखा तु पाहिजे. 
बातम्या आणखी आहेत...