आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Video: शाहरुख म्हणाला, फरहान आणि मला लोक 'मर्द' समजतच नाहीत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने अलीकडेच फरहान खानच्या 'मर्द' या एनजीओच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. हा कार्यक्रम महिलांच्या सुरक्षेसंदर्भात होता. या कार्यक्रमात शाहरुख खानने अगदी हटके अंदाजात महिलांचा गौरव केला.

 

तेथे उपस्थित लोकांशी संवाद साधताना म्हणाला, “असे म्हटले जाते की मिश्या या पुरुषार्थाचे प्रतीक असतात. लोक मला आणि फरहानला‘मर्द’ समजत नाहीत. कारण मी आणि फरहान जेंटल आहोत, शांत असतो आणि लाजाळूदेखील आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघेही स्त्रियांना आमच्या समान समजतो. इतकेच कशाला स्त्रिया या आमच्यापेक्षा सुपीरिअर आहेत. आम्ही त्यांना घाबरतोदेखील. माझ्या मते, जर पुरुष त्यांची गर्लफ्रेंड, पत्नी, आई किंवा मुलीला घाबरत असेल. तर हे चुकीचे नाही.” 


शाहरुख खान सध्या आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. त्याला जब हॅरी मेट सेजल हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. 


पुढे बघा, व्हिडिओत काय म्हणाला शाहरुख खान... 

बातम्या आणखी आहेत...